कोऱ्हाळे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील माळशिकारे वाडी येथे विविध विकासकामांची भूमिपूजने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ बजाबाप्पू माळशिकारे होते .
कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर काही ठरावीक ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भूमिगत गटार योजना, सारपायी रस्ता ,कारंडे आळी अंतर्गत रस्ता ताकवले रस्ता, हायमास अशा ७५ लाख रूपयां मंजूर कामांचे भूमिपूजन देवकाते यांच्या हस्ते पार पडले या वेळी नाना पाटील म्हणाले की हा सर्व निधी अजित पवार यांच्याकडून आपणास देण्यात येत आहे यात माझे कोणतेही श्रेय नाही .दादा व मतदार संघातील मतदारांनी सेवा करण्याची संधी दिली म्हणून जबाबदारीच्या पदावर काम करता आले .
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लालासो माळशिकारे ,माजी संचालक शेखर खंडागळे ,उपसरपंच लता नलवडे ,माजी सरपंच दत्तोबा भगत, दिलीपराव खोमणे ,मोहन भगत , ग्रामपंचायत सदस्य अनिल, शिंदे, कल्पना माळशिकारे ,वैशाली माळशिकारे ,हनुमंत जगदाळे, निरा मार्केट कमिटीचे माजी संचालक बाळासो माळशिकारे ,अजित माळशिकारे ,माजी उपसरपंच सुदीप माळशिकारे माजी सैनिक पांडुरंग मांगडे ,पप्पू कारंडे,शंकर माळशिकारे ,राहुल नाझीरकर ,अनिल खोमणे ,पोलीस पाटील संग्राम माळशिकारे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष बाजीराव किगरे ,सतीश माळशिकारे अॅडव्होकेट संतोष साबळे थोपटेवाढीचे माजी सरपंच मोहन थोपटे ,नारायण कारंडे , कालिदास माळशिकारे राहुल भगत आदी ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांचे आभार माजी सैनिक भगवानराव माळशिकारे यांनी मानले.