सोमेश्वर कारखान्याची ऑनलाइन वार्षिक सभा बेकायदेशीर, विस्तारीकरणावर पुन्हा सभा बोलवावी : सतीश काकडे

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची कालची वार्षिक सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करून विस्तारिकारणाबाबतची सभा परत बोलवावी अशी मागणी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केली आहे. 
          आज निंबुत ता बारामती येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकरी कृती समितीचे तालुकाध्यक्ष कल्याण भगत, सोमेश्वरनगर शाखाध्यक्ष शहाजी जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पासाहेब गायकवाड, अजय कदम, मदन काकडे, नितीन कुलकर्णी, विकास केंजळे, राहुल जगताप, दत्तात्रय भोईटे, बाळासाहेब राऊत, संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे काकडे म्हणाले. कालच्या ऑनलाइन सभेत संचालक मंडळाने विस्तारीकरण विषय घेण्याचे काही कारण नव्हते, संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्याने त्यांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. तसेच सद्या कारखाना निवडणूक आचारसंहिता असून यामध्ये कोणताही निर्णय घेतला जात नाही. मंग संचालक मंडळ धोरणात्मक निर्णय घेतच कसं असा सवाल उपस्थित करून विस्तारीकरणाचे चुकीचे आकडे सभासदांपुढे ठेवले जात आहेत. त्यामुळे विस्तारीकरणाच्या विषयावर पुन्हा सभा बोलवण्यात यावी. विस्तारीकरणाचा आकडा बोगस असल्याने येथून पुढे सभासदांना एफआरपी च्या वर एक रुपया मिळणार नाही. या संचालक मंडळाने कारखान्याचे वाटोळे केले असल्याचा आरोप काकडे यांनी केला. अध्यक्ष हे विस्तारीकरणाचा घाट का घालत आहेत? विस्तारीकरण स्वतःचे हित जपण्यासाठी आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. कालच्या कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत बोलताना काकडे म्हणाले, ऑनलाइन सभेची सर्व बटणे ही अध्यक्ष यांनी स्वतःकडे ठेवली होती, कोणाला बोलून देयचा आणि कोणाला नाही हे स्वतः अध्यक्ष ठरवीत होते. यामध्ये कृती समितीला बोलून दिले नाही काही सभासदांना बोलून दिले नाही. या बेकायदेशीर सभेचा शेतकरी कृती समितीच्या वतीने जाहीर निषेध करतो याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
       अजय कदम म्हणाले, कालच्या सभेत सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली नाही. तर मदन काकडे यांनी कारखान्यावर सद्या ४६० कोटी कर्ज दिसत आहे. विस्तारीकरणाचे १४० कोटी रुपये कर्जाचा बोजा सभदादांच्या डोक्यावर राहणार आहे. असे मिळून ६०० कोटी कर्ज होणार आहे. सद्याचे उत्पन्न आणि कर्ज याचा विचार केला तर कारखान्याच्या भविष्यासाठी हे घातक आहे. संचालक मंडळाच्या चांगल्या कामाला मदत करू मात्र चुकीच्या विस्तारीकरणास विरोध राहील.
To Top