उसाच्या थेट बांधावरून ते सिंगापूर देशातून सभासद सहभागी : सोमेश्वर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा इतिहासात प्रथमच ऑनलाइन पद्धतीने पार पडली.या ऑनलाइन सभेमुळे जे कधी वार्षिक सर्वसाधारण सभेला येऊ शकत नव्हते अशा इतर जिल्ह्यातील तसेच इतर देशातील सभासदांनी या सभेत आपला सहभाग नोंदवला. 
          या ऑनलाईन सभेत १७१ सभासदांनी प्रत्येक्ष आपला सहभाग नोंदवला तर ५ हजार पाचशे सदोतीस जणांनी ही सभा ऑनलाइन पहिली. यामध्ये लाटे येथील सभासद अभिजित खलाटे हे गेली सहा वर्षे सिंगापूर देशात नोकरीनिमित्त स्थायिक असुन ते ऑनलाइन सभेमुळे पाहिल्यांदा वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी झाले याबद्दल त्यांनी अध्यक्ष आणि संचालक मंडळ यांचे आभार मानले. तसेच पुणे येथील वाणेवाडी स्थायिक आयटी इंजिनियर अशोक जगताप यांनीही आपला सहभाग नोंदवला. 
           थेट उसाच्या बांधावरून ते सिंगापूर देशातून सभासद या ऑनलाइन सभेत सहभागी झाले होते. आजची ऑनलाइन सभा ही तब्बल पाच तास चालल्याने अनेक सभासदाना आपले प्रश्न मांडता आले.
To Top