मोठी बातमी : भाजप नेते दिलीप खैरे यांचे 'कमबॅक' : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज ठरला पात्र
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अर्ज बाद झालेले दिलीप खैरे यांचा उमेदवारी अर्ज आज वैद्य झाला आहे. त्यामुळे खैरे आता सोमेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहू शकतात.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दि २३ फेब्रुवारी २१ रोजी अर्ज छाननी मध्ये सलग तीन वर्षे ऊस न आल्याच्या निकषावर दिलीप खैरे यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. दि २५ रोजी याबाबत खैरे यांनी जिल्हा सहकारी संस्था निवडणूक निर्णय अधिकारी (प्रादेशिक सह संचालक) यांच्याकडे दाद मागितली होती. यावर दि ३ मार्च रोजी सुनावणी घेण्यात आली यामध्ये सोमेश्वर कारखाना व दिलीप खैरे यांनी आपल्या बाजू मांडल्या. आज दि ५ रोजी या सूनवणीचा निकाल होता यामध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी खैरे यांचा अर्ज वैद्य ठरवला.
जिथे निवडणुक प्रकिया थांबली तिथूनच पुन्हा सुरू
दि १५ फेब्रुवारी पासून सोमेश्वर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. २२ फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती तर २३ फेब्रुवारी रोजी अर्ज छाननी होती. यामध्ये तब्बल ९४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. मात्र कोविड मुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आज पुणे येथे सुनावणीत सोमेश्वर कारखान्याची निवडणूक ज्या ठिकाणी थांबवली आहे. तेथूनच पुढे निवडुक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दिलीप खैरे यांनी कमबॅक शब्द ठरवला खरा--------
२३ फेब्रुवारी रोजी उमेदवार अर्ज छाननीत खैरे यांचा अर्ज बाद केल्यावर सोमेश्वर कारखाना प्रशासन निवडणूक निर्णय अधिकारी यांना चुकीची माहिती देत असल्या कारणाने माझा उमेदवारी अर्ज बाद झाला असल्याचे सांगितले होते. मात्र मी निश्चित कमबॅक करणार असे खैरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते. खैरेंनी तो शब्द खरा करून दाखवला. यामुळे आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपला संजीवनी मिळाली आहे.
दिलीप खैरे- भाजप नेते
माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पक्ष पूर्ण ताकतीनिशी उतरणार आहे.