सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
पुणे जिल्हा परिषदेचे आरोग व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत स्वःता काकडे यांनी दुजोरा दिला आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे सभापती पद मिळाले आणि देशासह राज्यात कोविड ने हाहाकार माजवला. पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती पद मिळाले मात्र कोविड च्या पादुर्भावामुळे अनेक प्रश्न 'आ' वासून समोर उभे होते.
सभापती प्रमोद काकडे यांनी सर्वसामन्यासाठी काम करण्याची हीच संधी असून कामाचा सपाटा लावला. चोवीस तासातले अठरा तास काम केले. रोज सहाला उठून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील तालुका ना तालुका पिंजून काढला. प्रत्येक आरोग्य केंद्रांना भेटी देत तिथल्या आरोग्य समस्या जाणून घेतल्या. स्वतःचा प्रपंच आणि वडिलोपार्जित शेतीकडे दुर्लक्ष होत आहे हे दिसत असतानाही यांनी गेल्या एक वर्ष नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेतली मात्र आरोग्य सभापतीच्या आरोग्याची कोण काळजी घेणार? शेवटी जिल्ह्याच्या आरोग्य सभापतींनाही कोरोनाने गाठले.