सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
तुटलेला व चिंद्या झालेला गुंतागुंतीचा पाय यशस्वीरीत्या जोडण्यात आला , त्यानंतर रुग्णास पायाची बोटांची हालचाल करणे तसेच स्पर्श जाणवणे इत्यादी पूर्व क्रिया करता येत असल्याने रुग्ण समाधानी आहे.
साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & आई सी यु मध्ये सुसज्ज तीन वेगळे हाय टेक ऑपरेशन थेटर असून आत्तापर्यंत १०० पेक्षा जास्त ऑपरेशन विना अडचणी आणि अत्यल्प दरामध्ये पार पडल्या , ऑपरेशन आणि एकूणच उपचारास यश आणि उत्तम गुण आहे अशी सर्व रुग्णांचे समाधानकारक प्रतिक्रियात्मक चर्चा आहे
त्यामध्ये , स्त्रीरोग विभाग -स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठी काढणे, पिशवी काढणे, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन प्रसूती इत्यादी
अस्थीरोग विभाग- हाडांची शस्त्रक्रिया , कवठी, मणक्याच्या आणि इत्यादी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया
जनरल सर्जरी - अपेनडिक्स, हर्निया , लिव्हर, किडनी , आतड्याच्या , पित्ताशयाची शस्त्रक्रिया इत्यादी
मूत्राशय व किडनीच्या शस्त्रक्रिया - प्रोस्टेट, मुतखडा , किडनी इत्यादी विविध गाठी काढणे
अश्या विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्यातून तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी उपलब्ध आहेत
सुसज्ज व हाय टेक ऑपरेशन सुविधा एकाच छताखाली गुणवत्तापूर्ण व अत्यल्प दरामध्ये ग्रामिण भागात देण्याचा मानस हॉस्पिटल संचालक डॉ राहुल शिंगटे व फिजीशीयन डॉ विद्यानंद भिलारे (एम डी) यांनी दिली