मोरगांव : प्रतिनिधी
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा गावांत गेल्या तीन महीन्यात शेळ्या मेंढ्यावर लांडग्यांच्या कळपाचे हल्ले झाले होते. या बाधीत शेतकऱ्यांना सत्याएंशी हजार रूपये नुकसान भरपाई वनखात्याकडुन मंजुर झाली आहे . या धनादेशाचे वाट्प आज करण्यात आले .
तालुक्याच्या सहा गावात गेल्या तीन महीन्यात अन्नाच्या शोधार्थ लांडग्याच्या कळपाने शेळ्या मेंढ्या वाडग्यावर हल्ला चढवत शेळ्याव मेंढ्या फस्त केल्या होत्या . जोगवडी येथील ज्ञानेश्वर जयराम महानवर , दादासो सूर्यकांत जाधव सोनवडी , बाबासो दत्तात्रेय गाढवे आंबी , लक्ष्मण मल्हारी तांबे व लक्ष्मण नामदेव लकडे कोळोली , गणेश सोमा मोटे रा .मोढवे , देवीदास तात्याबा पिसाळ जळगाव या शेतकऱ्यांच्या शेळ्या - मेंढ्यांच्या वाडग्यावर लांडग्यांच्या कळपाने हल्ले केले होते . यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे . वनखात्याच्यावतीने वनपाल अमोल पाचपुते , वनरक्षक शकुंतला गोऱ्हे , माया काळे यांनी सदर घटनेचे पंचनामे नोंद करुन वनखात्याला नुकसान भरपाईचे प्रस्ताव दाखल केले होते .
यानुसार उप वनसंरक्षक राहुल पाटील व साहाय्य वनसंरक्षक मयूर बोठे यांनी संबंधीत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजुर केली आहे . या भुकसान भरपाई धनादेशाचे वितरण चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वनपाल अमोल पाचपुते , बाधीत शेतकरी व वनकर्मचारी गणपत भोंडवे आदी उपस्थित होते . उपस्थित शेतकऱ्यांनी वनखात्याने नुकसान भरपाई दिल्याबद्दल आभार व्यक्त केले .