सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिवस पण आम्ही नक्की काय करायचं : पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड

आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिवस पण आम्ही नक्की काय करायचं : पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आपल्याला अजूनही समजले नाही कि असे दिवस साजरे केले कि काय होणार..अगदी खरय कारण असे दिवस साजरे करणे सध्या तरी मिडिया मध्ये एक खुळच झालंय. कारण आपण असे काहीतरी केले कि वन्यजीव वाचतील, किंवा लोक वाचवतील अशी भावना झाली आहे. मात्र वन्यजीव वाचवायचे असल्यास आपल्याला त्याचे अधिवास वाचविणे आवश्यक आहे हि बाब आपण विसरून गेलो आहोत. 
अलीकडच्या काळात अगदी गेल्या २० वर्षापासून आपण वन्यजीवांचे अधिवास काय असतात हेच विसरून फक्त त्याचे छान छान फोटो काढायचे आणि मिडीयामध्ये सोडायचे. मग झाल वन्यजीव अभ्यासक किंवा तज्ञ होण्याच काम. काही प्रमाणत बावळट मीडियातील लोक फोटो छान काढला कि या छायाचित्रकाराला वन्यजीव अभ्यासक किंवा तज्ञ घोषित करतात, आणि पुढे आजची अवस्था काय आहे बघत आहोतच...वन्यजीवांची. फक्त फोटो काढून वन्यजीव जगू शकत नाहीत, तर त्यांना अधिवास कायमस्वरूपी वाचविणे अत्यंत गरजेचे आहे. वन्यजीव अधिवास वाचले तरच आपणही वाचनार आहोत हे वेळीच आपण सर्वांनी ध्यानात घेणे आवश्यक आहे. आपल्याला स्थानिक पातळीवर जनजागृती बरोबर आता कृतीशील प्रकल्प उभा करणे गरजेचे आहे. नाहीतर फक्त कागदावर वन्यजीव दिसतील. आजच्या वन्यजीव दिवसानिमित्ताने एकच संदेश आहे कि, आपल्याबरोबर वन्यजीव अधिवास वाचविणे आवश्यक आहे. अन्यथा फक्त गप्पागोष्टीच्या कार्यक्रमासारखे कार्यक्रम होतील. जर अधिवास वाचवायचे असतील तर काय करावे यासातही ....ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी – हि एक म्हण आहे, मग अनेकांना वाटत असेल कसे, समजून घेऊयात कि यामळे कसे वन्यजीव संरक्षण होत असते...कारण कि जर जगातील प्रत्येक भगात असणारी स्थानिक वृक्षसंपदा यात गवत, वेली, झाडे, झुडपे वाचली तरच वन्यजीव वाचतील अन्यथा नाहीच..  
आपल्याकडे जुन्या म्हणी आणि त्याचे अर्थ शाळेत मर्यादितच समजावले जातात. आज आपण जरा मोठा अर्थ घेऊन विचार करूयात. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच अधिवासात येणारी हि दोन काटेरी झाड. दक्षिणी काटेरी वने म्हणजेच हि म्हण असा एक अर्थ होतोय, कारण बोरी आणि बाभळी यांनीच हे अधिवास आजपर्यंत मजबूत ठेवले आहेत. आपल्याला जर हि बाभळीची वने वाचवायची असतील तर अधिक
बोरी आणि बाभळी करतात काय नक्की ..
बोरी व बाभूळ यांच्याशिवाय गवताळातील जैवविविधता जिवंत राहू शकत नाही, कारण अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी बोरी व बाभळी सारखी काटेरी झाडे अत्यंत उपयुक्त असतात. भारताच्या दक्षिणी काटेरी वनात अगदी कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान असा दक्खनच्या पठारावरील भागाला गवताळ काटेरी वने म्हणतात. याला सव्हाना सारखी काटेरी गवताळ वने असेही संबोधतात. यात गवताळ परिसरात काटेरी झाडे झुडपे असतात.
बाभळीचे उपयोग : अगदी छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या ग्रंथात अनेकदा बाभळीच्या झाडांचे उंबरे प्रत्येक घराला वापरले जातात म्हणून बाभळीला सुद्धा अतिशय महत्व दिलेले आहे. घराचा उंबरा बाभळीचा असला म्हणजे घर अतिशय मजबूत समजले जाते. अलीकडे या झाडाचा वापर मानव जास्त प्रमाणात माणसे जाळण्यासाठी करीत आहे. परिणामी बाभळीची संख्या झपाट्यानेकमी होत चालली आहे. शिवाय आजकालच्या नाटकी जगात तर माणसाला बाभूळ नकोशी झाली आहे. कारण तिला काटे असतात, मग काय, शिक्षित मुर्खांनी तिच्या ऐवजी परदेशी झाड लावली परिणाम आपली स्थानिक जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे.
सर्व दातावरील उपाययोजना म्हणून आपल्यापेक्षा शेळ्या – मेंढ्या – हरणे  आहेत. कारण त्यांना माहिती आहे कि बाभळीच्या शेंगा व फांद्या खाल्या मुळे आपले दात आयुष्यभर कधीही दात किडत नाहीत. हीच गोष्ट शिक्षित मानवाला मात्र अजिबात माहिती नाही हे नवल. मात्र अनेक दंतमंजन करणाऱ्या कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणात या बाभळीच्या शेंगा गोरगरीब जनतेकडून गोळा करून घेतात, आणि बबुल पेस्ट तयार करतात. खरतर आपण अश्या बाभळीच्या शेंगा उन्हाळ्यात एकत्रित करून , सावलीत १० दिवस वाळवून, मग त्या सोलून त्यातील बिया पुन्हा निसर्गात टाकून द्याव्या, आणि सालीची कुटून पावडर करावी, हि जगातील उत्तम दंतमंजन आहे. हे मी, डॉ महेश गायकवाड १०० टक्के सांगतो कि, आपले दात कधीही कीडनार नाहीत शिवाय किडले असतील तरी सुद्धा बरे होतील. कीडनियंत्रण होऊन दात मजबूत होतील, हे नक्कीच.. अनेकजन तर हि शेंगाची पावडर कोमट पाण्यात टाकून पितात, शक्तिवर्धक आहे, त्यामुळे हाडे बळकट होतात. साधी बोर मोठ्या खाल्ली तर पोटातील आजार कायमचे बरे होतात. आजही भोगी म्हणजे मकरसंक्रांतीच्या सनात बोर घालून खेगाट केले जाते. लोक खूप आवडीने खातात.
गावातील महिला तर बोरी बाभळीचे काटे आपल्या नाकात व कानात घालून , टोचलेले नाक व कानातील बिळ बुजु नये म्हणून आजही वापरतात. काट्यानेच काटा काढावा अशी म्हण सुद्धा प्रचलित आहे. हो साधी बोर आणि साधी बाभळी ची झाड वाचविणे गरजेचे आहे.
वन्यजीवांसाठी या बाभळी व बोरी अतिशय उपयुक्त आहेत, इथ मी लिहियला सुद्धा कमी पडेल इतकी हि दोन झाड किफायतशीरआहेत निसर्गात अर्थात अन्नसाखळी मध्ये. इथ रातकिडा राहतो आणि किर्रर्र आवाज काढून आपल लक्ष वेधून घेत असतो. आपण जसजस बाभळी व बोरीचा जवळ जाऊ तसा अचानक आवाज बंद होतो, आपल्याला वाटत आपल्याला रातकिडे घाबरले पन विचार संपतोय तोपर्यंत पुन्हा किर्रर्र आवाज सुरूच. आपण अगदी त्या आवाजाच्या जवळ पोचलेलो असतो मात्र रातकिडा काही केल्याने दिसत नाही. अगदी १० लोकांमध्ये एकालाच दर्शन मिळते. खरतर इतक साधर्म्य असते कि बाभूळ त्याला आपल्या कुशीत लपवत असते कि काय. मात्रा त्याचा बाह्य रंग व बाभळीची साल याचं रंगरूप जवळपास एकच झालेले दिसून येत. मोळीकिडा तर आपल्याला लहानपणापासून परिचित असतो. काटे एकत्रित येऊन अस गोल करतात मात्र हे कस, हे कोड लवकर सुटत नाही, मात्र हा किडा त्याची आळी अवस्था या गोल काटेरी झुंबरात पूर्ण करतात आणि मग हा कीटक आपले पुढील आयुष्य निसर्गात घालवतो. हा मोळीकिडा फक्त या बाभळीच्या काट्यानेच आपले घर तयार करू शकतो. अनेक कोळी आपल घर याच बाभळीच्या फांद्यावर बांधतात. आपल सार जीवन याच बाभलीवर पूर्ण करतात. कीटकांची दुनियादारी याच बाभळीवर आपला जीवनक्रम सुरु करतात व शेवटही...
बोरी- बाभळीची फौज : हो, हो, फौजफाटा अहो फक्त मानवाला अक्कल आहे अस आपल्याला वाटतय. मात्र निसर्गात अनेक झाड आपली फौज पाळतात. अनेक कीटकांना बदल्यात अनेक गोष्टी झाडांना मोफत द्याव्या सुद्धा लागतात बर का.
आपण बारकाईने हि झाड पहिली तर दिसेल कि, अनेक मुंग्या- मुंगळे अश्या झाडांवर गस्त घालत फिरत असतात. हि गस्त घालताना अगदी बाभळीच्या बुडक्यातून ते शेंड्यापर्यंत गस्त घालावी लागते. गस्त घालताना झाडवर एखाद्या प्राण्याने जर झाडाला घासायला सुरुवात केली तर हि फौज घासणार्या प्राण्यांच्या अंगावर तुटून पडते, तो प्राणी कितीहि मोठा असला तरी त्याला पळ काढण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अनेक सैनिक चावे घेत असतात. या बदल्यात झाड त्यांना आपल्या शरिरातील गोडसर स्त्राव खाण्यासाठी देत असतात. मग काय फौज २४ तसं सावधान असते, झाडाच्या प्रत्येक फांदीवर, हे विशेष.
अहो जर अशी फौज वाढली तरी, झाड काळजी करीत नाही. कारण या फोजेला खायला सुद्धा सरडा तयार असतोच. इथ सुद्धा प्रत्येक सरड्याची एक बाभूळ असते, अगदी त्याचा मालकी हक्कच म्हणा कि. कारण प्रत्येक नर सरड्याला एक बाभूळ किंवा बोर नसेल तर मग मिलन करणे अवघड असते. कारण प्रत्येक नराला झाडावरून आपला सुंदर चेहरा जमिनीवरील मादीला दाखवायचा असतो. आणि यासाठी त्याला एक मजबूत घर असावे लागते, म्हणून नर आपल्या बाभळीकडे दुसर्या सरड्याला डोकवू सुद्धा देत नाहीत, हे साम्राज्य युद्ध आहे. मग सरडा जास्त झालेली फौज हळूहळू संपवत असतो. म्हणजे अन्नसाखळी मजबूतहोताना आपल्याला दिसून येईल. आपण सहजपणे म्हणतो, काय सरड्यासारखा ताठू नकोस, मरशील लेका. अहो असेच सरडे मादीला आकर्षित करताना रोडजवळ येतात, बाभूळ नसेल तर मग हा संघर्ष जमिनीवर सुरु होतो, एकमेकांना धमकी देण्याचा, आणि मग भरधाव वेगाने आपली वाहन अश्या हजारो मिलनासाठी उस्तुक असणार्या सरड्याना वाहनाखाली चिरडतो. म्हणून परिसरात बाभळी बोरी असणे आवश्यक आहे. 
    सहजीवन ते पण चिंकारा हरीण व बोरी बाभळीचे.. आता आपण विचार बोरी व बाभळी मुळे चिंकारा सारखी हरणे जिवंत आहेत, बर्याच लोकांना याबद्दल माहिती सुद्धा नसेल कि, जर बोरी बाभळी नसतील तर चिंकारा हरणे सुद्धा जिवंत राहणार नाहीत. त्याच अस आहे कि, हि हरणे ७० टक्के झाडांचा पाला ओरबडून खातात. यात बोरी बाभळीची पाने ओरबडून खातात शिवाय शेंगा व बोर सुद्धा मोठ्या प्रमाणात खात असतात. आपण जर माळरानात भटकत असाल तर लगेच लक्षात येईल कि, सर्वच माळरानातील बोरी बाभळीची उंची हि चिंकारा हरणांच्या उंची पेक्षा फुटभर सुद्धा जास्त नसते, यालाच तर खुरटी बाभळीची वने म्हणतात. या भागात बोरीब बाभळी उंचीला खुरट्या असतात, कारण चिंकारा जेवढा उंच तेवढीच बाभळ बोर उंच. अहो उन्हाळ्यात तर चिंकारा बोर खूप आवडीने खातात, मग भराभर बोर खातात, न चावताच, नंतर रवंथ करताना पुन्हा पोटातून गिळलेलि बोर काढून त्यातील गर खाल्ला जातो आणि आटोळ्या एकत्रितपणे साठवल्या जातात, अर्थात त्याचे छोटे छोटे ढीग तयार होतात. याचा वापर पुन्हा खाद्य कमी पडू लागले कि खायला करतात. अश्यावेळी त्या आटोळ्यामधील आतला मऊ गर खातात. तसेच यातील काही आटोळ्याना केसाच्या आकाराचा तडा जातो, आणि अश्या आटोळ्या पावसाळ्यात रुजातात, आणि बोरीची झाडे निर्माण होतात. शिवाय बाभळीच्या शेंगा खाऊन त्यांच्या विष्टेतून खाली पडतात, आणि रुजतात. तसेच बाभळीचा  पाला व शेंगा खाताना खाली पडतात त्याही रुजतात. अहो यालाच तर सहजीवन म्हणतात, बाकी काय. आणि उन्हाळ्यात चिंकारा पाणी म्हणून माकडशिंगी सारख्या छोट्या निवडुंग कुळातील वनस्पती खातात, आणि आपली तहान भागवितात. दररोज पाणी पिण्याची चिंकाराना गरज नसते. अगदी ४० दिवसापर्यंत सुद्धा.
आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी तर बाभळी विषयी खूप माहिती जगाला दिली आहे. माझे गुरु असल्यामुळे तर माझा ( डॉ महेश गायकवाड) लेखच पूर्ण होऊ शकत नाही, कारण चितमपल्ली सर म्हणजे ‘’ असामान्य निसर्ग तज्ञ ’’. बाभळ व बोर यांची बारकाईने निरीक्षणे घेतल्यास लक्षात येईल कि, खालील फांद्यांना काटे खूप टोकदार असतात. कारण स्व स्वरक्षण करणेसाठी अत्यंत महत्वाचे. शिवाय खोडाचा रंग काळसर कारण उष्णतेमुळे जास्त बाष्पीभवन होऊ नये. अहो इथ अंगावर काटे आहेत ते संरक्षण करणेसाठी असे आपल्याला वाटत असेल, मात्र अजूनही बरेच काही यात लपले आहे. काटे अर्थात जल नियोजन, अहो पूर्व इतिहास पाहता, काटेरी वनामध्ये अगदी १० वर्षे सुद्धा सातत्याने दुष्काळ या बोरी बाभळीनि अनुभवला आहे. मग पाण्याचे नियोजन करायचे असल्यास हे काटे मदत करतात. काटे आतून पोकळी असतात, हे काटे रात्री – पहाटेच्यावेळी पडणारे दवबिंदू साठवून सर्व फांद्यांना पुरवितात. त्यामुळे कसल्याही दुष्काळाचा सामना सहजपणे बोरी बाभळी करतात. बोरी ला मोहोर येतो त्यावेळी तर तिच्या भोवती उभे राहण्याची हिम्मत होणार नाही, कारण एक उग्र वास त्या फुलाभोवती हे झाड निर्माण करते, अगदी एक रसायन तयार करून आपला मोहर सांभाळतात.  बाभळीची फुले खूप सुंदर दिसतात, यावर अनेक मधमाश्या आपला मोर्चा वळवितात. बोरीच्या मोहरावर सुद्धा अनेक मधमाश्या व छोटे कीटक आपला मोर्चा वळवितात. बोरी बाभळी वर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पोळी बांधतात. हे अतिशय महत्वाचे आहे. शेतीच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर बोरी बाभळी असणे नितांत गरजेचे आहे. हि बाब जर वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. अनेकजण बांधावरील बोरी बाभळी तोडून टाकतात आणि परदेशी झाड लावतात, मात्र असे करणे म्हणजे फक्त मूर्खपणाचा कळस, एवढेच मी म्हणेल. कारण गवताळ भागातील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासून बोर बाभूळ हि झाड अत्यंत महत्वाची आहेत, हे विसरून चालणार नाही. डाळींब पिक करणार्यांनी तर शेतीच्या परिसरात स्वतच्या १ एकरात बांधावर अगदी १० बोरी व १० बाभळी झाडे लावली तरच डाळींब करावे नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. आपल्याकडील छोटी मधमाश्यांची पोळी हि नेहमी अश्या काटेरी झाडांवर पोळी करतात. म्हणून नैसर्गिक झाडे ठेवणे आवश्यक आहे.   
पक्षी जगासाठी तर हि बोर व बाभूळ हि झाड म्हणजे बहुगुणीच. अनेक पक्षी घरटी बांधण्यासाठी बोरी बाभळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. अहो सुगरण पक्षी तर आपला खोपा अश्या झाडांवर बांधायला नेहमीच अग्रेसर असते. तिला बोरी बाभळीची झाडे खूप आवडतात, मात्र माणसाला नाही, बर का. सुगरण सर्वाना आवडते मग बाभळ का नको. आपल पर्यावरण प्रेम म्हणजे फक्त नाटक असेल तर आजचा कोरोना आजार तरी कुठ वाईट आहे मग. कारण जगात अधिवास नष्ट झाले कि तिथले जीव नष्ट होतात, आणि जिथ जैवविविधता जास्त असते तिथ रोगराई कमी असते. हे आता आपल्याला शिकायला हवे आहे. आज भूतान सारख्या देश्यात फक्त ५ लोकांना कोरोना झालेला असून, हा आजार तिथ जास्त पसरलेला नाही, कारण निसर्ग अर्थात जैवविविधता सर्व जगात जास्त आहे तिथ.
अहो कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या असे नानविध पक्षी या बोरी बाभळी वर घरटी बांधतात. हि घरटी लांबून पाहताना खूप आंनद वाटतो. आता पावश्या ओरडत होता मी लेख लिहताना, अहो त्याच्या आवाजने मी चकित झालो, मला लक्षात आले कि, त्याचे काटेरी घरटे सुद्धा बाभळीच्या झाडावरच असते. हे यात नमूद करावे असे तर वाटले नसेल त्याला.
बाभळीच्या झाडावर खारुताई घरटे करीत असते. शिवाय तिला राह्नेसाठी बाभळी आवश्यक आहेत. शिकारी पक्षाकडून तिला बाभळी मुळे संरक्षण मिळत असते.
अहो कोल्हा बोर आणि बाभूळ झाडाखाली विश्राती घेत असतो. शिवाय बोरही मोठ्या प्रमाणात खात असतो. कोल्हा सुद्धा बोरीची झाड लावायला मदत करीत असतो. सश्याच रिंगण तर बोरीच्या झाडाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, कारण गवताळ भागात ओढ्यालगत पसरी बोराची झाड असतात. अहो उंची फक्त ३ फुट एवढीच असते. ससा या बोरीच्या कडेने वाढणार्या गवतात आपले रिंगण तयार करतात आणि पिल्लांना जन्म देतात. काहीजण तर आजही म्हणतात भारतीय ससा बिलात राहतो. पण लक्षात घ्या कि, भारतीय ससा बिलात राहत नाही. ती बहुतांश बिले घोरपडीने केलेली असतात. आता विचार करा कि, इथ मुंगी पासून चिंकारा हरणांपर्यंत सगळे वन्यजीव कसे फक्त बोरी व बाभळी मुळे संरक्षित होत आहे. आणि आपण बोरी बाभळीची काटेरी वने च नष्ट करतोय....बघा विचार करा.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिवस पण आम्ही नक्की काय करायचं : पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड
आज ३ मार्च जागतिक वन्यजीव दिवस पण आम्ही नक्की काय करायचं : पर्यावरण तज्ञ डॉ महेश गायकवाड
https://lh3.googleusercontent.com/-zvSTt7aeYIM/YD8_xanwzAI/AAAAAAAAI-Y/0RibKtmkt6YR9whdZiV2tM7p-pXOd7dAgCLcBGAsYHQ/s1600/1614757818389661-0.png
https://lh3.googleusercontent.com/-zvSTt7aeYIM/YD8_xanwzAI/AAAAAAAAI-Y/0RibKtmkt6YR9whdZiV2tM7p-pXOd7dAgCLcBGAsYHQ/s72-c/1614757818389661-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/03/blog-post_78.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/03/blog-post_78.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy