रविवारी सोमेश्वरनगर येथे महारक्तदान शिबिर : रक्तदात्यांना मिळणार एक लाखाचा विमा कवच

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील विविध सामाजिक संघटनांनी मिळून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले असून आपल्या महाराष्ट्राची रक्ताची गरज ओळखून जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करण्याचे अवाहन आयोजकांनी केले आहे. 
          सध्या कोरोना काळामध्ये बारामती तालुका पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात रक्ताची कमी भासत असल्यामुळे सोमेश्वरनगर परिसरातील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन, आजी माजी सैनिक संघटना, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, सोमेश्वर कारखाना, मराठा सेवा संघ, आशा प्रकल्प, मेडिकल असोसिएशन, सोमेश्वर डॉक्टर असोसिएशन, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, साद संवाद स्वच्छता ग्रुप, सराफ असोसिएशन, ग्रामपंचायत निंबुत, ग्रामपंचायत वाघळवाडी, ग्रामपंचायत वाणेवाडी, ग्रामपंचायत मुरूम, ग्रामपंचायत करंजेपुल, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, बालाजी ग्रुप, बैलगाडा संघटना, सोमेश्वर ट्रेकर्स, सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब, विवेकानंद अभ्यासिका आदींच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले असून
यामध्ये रक्तदान शिबीर व प्लाझ्मा डोनेट तपासणी होणार आहे.  सोमेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज समोर  दिनांक - १८ एप्रिल रविवार रोजी सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार आहे. दरम्यान कोविड लस घेतल्यानंतर 56 दिवसांनी आणि कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवसांनी रक्तदाते रक्तदान करू शकतात असे अक्षय ब्लड बँकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. सर्व कोरोनाचे शासकीय नियम पाळून शिबीर आयोजित केले जाईल. तसेच रक्तदात्याने येताना आधारकार्ड आणावे. 

रक्तदात्यास विमा कवच---------
प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांच्या वतीने न्यू इंडिया इन्शुरन्स चा आरोग्य विमा शिबीरच्या ठिकाणी देण्यात येणार आहे.
To Top