सुप्यात होणार व्यापाऱ्यांची एंटीजन टेस्ट : ग्रामपंचायत प्रशासनाचा निर्णय

Admin
सुपे : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजणाऱ्या सुपे येथील व्यापारी, भाजीपाला व फळ विक्रेत्यांची एंटीजन टेस्ट ग्रामपंचायतीच्यावतीने शुक्रवारी ( दि. २३ ) ग्रामसचिवालय येथे करण्यात येणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबतचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने घेतला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली. 
            कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ज्या भागात रुग्ण आढळुन आले आहेत. त्या ठिकाणच्या परिसरात ग्रामपंचायतीच्यावतीने सॅनिटायझरची फवारणी करण्यात आहे. येथील वयोवृद्ध, लहान मुले यांनी घराबाहेर पडू नये. तसेच कोणीही विनामास्क बाहेर फिरु नये याबाबतची दवंडीद्वारे जनजागृती  ग्रामपंचयतीच्यामार्फत करण्यात येत आहे. 
             करोनाचा वाढत्या प्रसाराला आळा बसण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत येथील किराणा व्यापारी, भाजीपाला तसेच फळे विक्रेते यांच्या एंटीजन टेस्ट करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे या व्यापाऱ्यांना काही लक्षणे दिसुन येताच वेळीच उपचार घेता येवु शकतात. तसेच पुढे होणारा धोका टळु शकतो अशी माहिती सरपंच स्वाती हिरवे, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली. त्यामुळे येत्या शुक्रवारी ( दि. २३ ) सर्वच व्यापाऱ्यांनी या टेस्टचा लाभ घ्यावा असे आवाहन लोणकर यांनी केले आहे. 
                         
To Top