बारामती : प्रतिनिधी
रेमडेसिविर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत पॅरासिटीमॉल भरुन काळ्या बाजारात विक्री केल्याचा प्रकार बारामती ग्रामीण पोलीसांनी काही दिवसांपुर्वीच उघड केला होता.पोलिसांनी सापळा रचुन शुक्रवारी(दि १६) एमआयडीसीत पेन्सिल चौकात त्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या.रेमडेसिविर च्या तुटवड्याचा फायदा घेवुन हा प्रकार सुरु होता.आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चौघा जणांवर तालुका पोलिसांनी मंगळवारी (दि २०) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर), प्रशांत सिध्देश्वर धरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) व शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी चौघाजणांची नावे आहेत.याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे.