सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या वतीने सोमेश्वरनगर येथे मोकर फिरणारांची आज ३८ जणांची ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकसुद्धा पॉझिटिव्ह सापडला नाही.
जिल्ह्यात मोकार फिरणारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना पसरत आहे. त्यामुळे आज वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शनाखाली सोमेश्वरनगर येथे मोकर फिरणाऱ्यांची ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली यामध्ये एकाही नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यावेळी करंजेपुल चे सरपंच वैभव गायकवाड, वडगाव निंबाळकर ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप, नितीन बोराडे, लोहकरे, साळुंखे यांच्यासह होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ ज्ञानदीप राजगे तसेच आरोग्य सेवक परवेज मुलाणी उपस्थित होते.