सोमेश्वरच्या डॉक्टरचे फेसबुक अकाउंट हॅक, एका फेसबुक मित्राने हॅकरच्या अकाउंटला भरले चक्क १० हजार : डॉक्टरांची पोलीस स्टेशनला धाव

Admin

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील भगवती क्लिनिक चे डॉक्टर सुधीर कदम यांचे दुसरे फेसबुक अकाउंट काढून या अकाऊंटवरून फेसबुकच्या सर्व मित्रांना पैशांची मागणी केली जात आहे. डॉ कदम यांचे फेसबुक मित्र ग्रामसेवक हनुमंत भंडलकर यांनी चक्क हॅकरच्या अकाउंटवर १० हजार रुपये भरले. आणि डॉक्टरांनी पोलिसांना धाव घेतली. 
        हॅकरने डॉ सुधीर कदम यांचे दुसरे फेसबुक अकाउंट काढले  आहे. काल रात्री हे फेसबुक अकाउंट काढले असून या अकाऊंट वरून फेसबुकवर च्या सर्वच मित्रांना मी अडचणीत आहे, माझे घरचे दवाखान्यात आहेत. पैशांची अडचण आहे अशी मागणी केली जात आहे. आज सकाळी डॉ कदम यांचे फेसबुक मित्र हनुमंत भंडलकर यांनी हॅकरच्या अकाउंट ला १० हजार भरले. हॅकरच्या त्रासाला कंटाळून डॉ कदम यांनी करंजेपुल पोलीस स्टेशन गाठले आहे. दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे सपोनि सोमनाथ लांडे व सपोउनि योगेश शेलार यांनी याबाबत तक्रार दाखल करून घेतली असून डॉ कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी सायबर सेलला इमेल करून तक्रार केली आहे.
To Top