राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार व मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर सोशल मिडियातुन टीका : वडगाव निंबाळकर पोलीसांत गुन्हा दाखल

Admin


सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे व महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर सोशल मिडीयात खालच्या स्तरावर टिका करणा-या लोकांवर आज वडगाव निंबाळकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
           याबाबत सोमेश्वरनगर येथील नितीन संजय यादव यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यामध्ये यादव यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हणटले आहे की,  दि ६ मे रोजी ११ वाजण्याच्या सुमारास मी करंजेपूल येथे असताना मी माझ्या फेसबुक अकाउंट uri आकाउंट वरून स्क्रोल करत असतांना केशव कुंथलगिरीकर याने त्याचे फेसबुक url अकाउंट नं https//www.facebook.com /kunthalgirikark वरून महाराष्ट्र राज्याचे मंत्री अदित्य ठाकरे यांचा व्यंगात्मक केलेला फोटो तयार करून झुलेवादी पार्टी अशी पोस्ट करून त्यांच्या लौकीकास बाधा येईल असा फोटो व पोस्ट केली .तसेच भानु बोराडे याने त्याच्या फेसबु url अकाउंट नं https//www.facebook.com /borade
Bhanu या अकाउंट वरून खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  अशा घटनात्मक पदाच्या व प्रतिष्ठीत राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकीकास बाधा आणणेकरीता त्यांचे फोटो मॉर्फ करून सोशल मिडीयावर प्रसारीत करून त्यांचे लौकीकास बाधा येईल असे फोटो व पोस्ट
करून त्यांची बदनामी केली आहे म्हणून माझी फसेबुक अकाउंट धारक केशव कुंथलगिरीकर व भानू बोराडे यांचे विसध्द माझी तक्रार आहे.
                 यावरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधितांविरोधाचे गुन्हा दाखल केला आहे.
To Top