सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सचिन खलाटे यांनी बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटर मध्ये आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करत कोविड सेंटर मधील रुग्णांसाठी पंधरा दिवस पुरेल एवढे अल्पोपाहाराचे किराणा साहित्य दिले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
सद्या वाणेवाडी येथील कोविड सेंटर मध्ये ४० च्या आसपास रुग्ण आहेत. तर निंबुत या ठिकाणाच्या विलीगिकरण कक्षात ८ रुग्ण आहेत. या दोन्ही ठिकाणावर एकाच जागेवरून चहा, नास्ता व जेवण जाते. आज सोमेश्वर चे संचालक सचिन खलाटे यांनी १५ दिवसांचे किराणा साहित्य दिले. तर काल सोमेश्वर पत्रकार ग्रुप च्या वतीने देखील १५ दिवसांचा किराणा देण्यात आला. सचिन खलाटे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, राजेंद्र धुमाळ, कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे, पत्रकार महेश जगताप व नितीन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS