सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
देणाऱ्याने देत जावे...घेणाऱ्याने घेत जावे ..याची प्रचिती वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरच्या रुग्णांना येत आहे. सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पुढाकारातून रामराजे जगताप मंगल कार्यालयात कोरोना सेंटर सुरू झाले आणि या सेंटरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
सोमेश्वरनगर परिसरातील विविध सामाजिक संघटना यासाठी सरसावल्या आहेत. कोणी अंडी दिली तर कोणी नास्ता... कोणी भाजीपाला तर कोणी किराणा तर कोणी धान्य...नुकतीच या कोविड रुग्णांना पुरुषोत्तम जगताप यांच्या वतीने मांसाहारी जेवण देण्यात आले आहे. पत्रकार ग्रुप, सोमेश्वर चे संचालक सचिन खलाटे यांच्याकडून मदत देण्यात आली आहे. तर काल इंजिनीअर वडेवाला अक्षय शिंगाडे यांच्या वतीने हापूस आंब्याच्या दहा पेट्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांना हापुसची चव चाखायला मिळणार आहे.
सोमेश्वर कारखन्याचे अध्यक्ष पुरुषो्तम जगताप, संचालक किशोर भोसले, विशाल गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिखरे, महेश जगताप, वाघळवाडी ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, विकास सावंत, गणेश शिंदे उपस्थित होते.
COMMENTS