सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पाचवी पासून बारावी पर्यंत एका बाकावर बसलो, एका डब्यात जेवलो, सुखदुःख वाटून घेतली... बारावी नंतर जो तो आपल्या व्यवसायात गुंतला..अचानक १९९९ च्या शाळेच्या व्हाट्स अप ग्रुप वर मेसेज पडला की आपला वर्गमित्र कोरोनाने आजारी आहे त्याला शासकीय दवाखान्यातून खाजगी दवाखान्यात भरती केले आहे. पैशांची गरज आहे. ४७ वर्गमित्रांनी फुल नाही फुलाची पाकळी देत मित्रालाच्या दवाखान्याच्या खर्चाला आर्थिक हातभार लावला.
बारामती तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वानेवाडी १९९९ च्या बॅचमधील मित्र पाचवी ते दहावी बरोबर असणारा अशोक दत्तात्रेय कोलते वाणेवाडी आत्ता सद्या त्याचे मूळ गावी पिसर्वे ता. पुरंदर या ठिकाणी त्याच्या मूळगावी राहतो. मागील पंधरा दिवसापूर्वी आमच्या ग्रुपमध्ये तो कोरूना पॉझिटिव्ह आहे असा ग्रुप वर मेसेज पडला. तो सुरुवातीला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता पण त्याचा कोविड स्कोर वाढल्यामुळे त्याला चिंतामणी हॉस्पिटल सासवड या ठिकाणी ऍडमिट करावे लागले त्याची आर्थिक परिस्थिती फार नाजूक असल्याने तसेच त्याचा उपचाराचा खर्च जास्त आहे. असा मेसेज ग्रुप वर मेसेज पडला आणि पाहता पाहता सर्वच वर्गमित्र सुदामासाठी धावले. ग्रुपमध्ये एकाच दिवसात कोणी फोन पे कोणी गुगल पे ग्रुप मधल्या अमित शेळके या नंबर वर पैसे पाठवले एकाच दिवसांमध्ये ४७ हजार ५०० रुपये जमा झाले. कोणी तीन हजार, कोणी दोन हजार, कोणी एक हजार तर कोणी पाचशे रुपये दिले.
ती रक्कम त्याने त्याच्या अकाउंट मधून काढून अशोक कोलते यांच्या पत्नीकडेकडे सुपूर्त केली आहे.
COMMENTS