सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना ' एक घास आईचा ' या उपक्रद्वारे दररोज सकाळी मोफत नाष्टा देण्याचे काम येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे संचालक विलास वाघचौरे करीत आहेत.
मागिल सोळा दिवसापासुन अविरत हा उपक्रम सुरु आहेत. वाघचौरे यांनी ५० जणांचा व्हॉट्सॲप ग्रूप बनवला आहे. त्यांतर्गत मुंबई, नाशिक, अ. नगर, पुणेसह काही तालुके तसेच बारामती तालुक्यातील काही जणांचा समावेश आहे. तसेच सुप्यातील काही किराणा दुकानदार व खाजगी डॉक्टर यांची या कामी मदत मिळत आहे.
या दानशुर व्यक्तींच्या येणाऱ्या मदतीतुन आत्तापर्यंत सुमारे एक हजार ७०० जणांना मोफत नाष्टा देण्याचे काम केले आहे. यात कोविड रुग्ण, डॉक्टर, परिचारीका तसेच इतर कर्मचारी आदींना दररोज नाष्टा देण्यात येत आहे.
यासाठी सकाळी चार वाजता उठुन नाष्टा बनविण्याकामी सागर वाघचौरे, आकाश राठोड, दत्ता वाघचौरे, विष्णु वाघचौरे, अक्षय काळे आदींची मदत होते. या तरुणांच्या माध्यमातून सकाळी नाष्टा बनविण्यात येतो. त्यानंतर सकाळी आठ वाजेपर्यंत कोविड सेंटरमधील रुग्णांपर्यंत त्याचे वाटप करण्यात येते. तर दर रविवारी नाष्टयासह दुपारी मांसाहार जेवण देण्यात येत असल्याची माहिती विलास वाघचौरे यांनी दिली. सुप्यात मागिल आठवड्यात कोविड सेंटर सुरु झाले आहे. मात्र त्या अगोदर पासुन मोरगाव येथील कोविड सेंटरच्या रुग्णांना नाष्टा देण्याचे काम सुरु आहे. तसेच या दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर आहे तो पर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वाघचौरे त्यांनी सांगितले. तसेच या सेंटर मधील एखाद्या रुग्णाचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबाला अंत्यविधीसाठी पी पी किट मोफत उपलब्द करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देऊळगाव रसाळ येथील तरुणांनी मागिल आठवड्यात एकत्र येत ' एक हात मदतीचा ' या उपक्रमाद्वारे देऊळगाव रसाळ येथे विलगिकरणात असणारे रुग्ण, आणि सुपे व सोमेश्वर येथील कोविड सेंटरमधील सुमारे १०० रुग्णांना दररोज सकाळी उकडलेली प्रत्येकी दोन अंडी देण्यात येत असल्याची माहिती अय्याज इनामदार यांनी दिली. या तरुणाने सोनपीरवाडीत आरीफ इनामदार, अहमद इनामदार, इम्राम इनामदार, शुभम कुंजीर, साहिल इनामदार, तोशिक इनामदार, फारुख इनामदार, रशीद काझी आदींच्यावतीने ' एक हात मदती ' चा हा उपक्रम राबवित असल्याचे इनामदार यांनी सांगितले.
दरम्यान येथील कोविड केअर सेंटरमध्ये सुपे येथील शाहमन्सूर दर्गा वक्फ कमेटीच्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी १० वाफेचे मशिन (स्टीम मशिन) व रुग्णांना पांघरूण घेण्यासाठी लागणाऱ्या १० ब्लॅंकेट वाटप करण्यात आल्याचे कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूस कोतवाल यांनी दिली. यावेळी येथील बोरकर बंधुंतर्फे ( सनी चायनीज) कोरोना रूग्णांसाठी चिकन सूपचे वाटप केल्याचे सांगितले.
याप्रसंगी माजी सभापती निता बारवकर, मार्केट कमेटीचे माजी सभापती शौकत कोतवाल, दर्गा कमेटीचे खजिनदार समीर डफेदार, अयूब शेख, पिंटू मोगल तसेच अनिल हिरवे, मुनीर डफेदार, अशोक लोणकर, काका कुतवळ, संजय बारवकर, गणेश बोरकर आदी उपस्थित होते.
........................................
COMMENTS