सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील मोढवे परिसरातील खडी क्रशर बंद करण्यात यावे यासाठी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता. त्याची दखल महाराष्ट्र प्रदूषण प्राधिकरणाने घेतली असून स्वामी समर्थ स्टोन क्रशर,(चौधरवाडी ता.बारामती) यांना प्रदूषण विभागाने दणका दिला आहे, खडी क्रशर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत व सोमेश्वर स्टोन खडी क्रशर आणि वरदराज स्टोन क्रशर यांना परत ऐकदा सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच याबाबत ताशेरे ही ओढले आहेत तसेच जिल्हाधिकारी गौण खनिज खणी कर्म विभागाने देखील दखल घेतली असून बारामती तसेच पुरंदर तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागितला आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौंड तालुक्याचे निरीक्षक बापुराव सोलनकर व माणिक काळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे, यावेळी सोलनकर म्हणाले की मोढवे परिसरातील शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, शेतीतील पिकांचे नुकसान, घरांना, मंदिरांना तडे गेलेले आहेत तसेच मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्यामुळे पाण्याची पातळी खाली जाऊन विहिरी कोरड्या पडायला लागल्या आहेत त्यामुळे, येथील शेतकऱ्यांना धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे त्यामुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या खडी क्राशरवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. सोलनकर म्हणाले की श्री स्वामी समर्थ स्टोन क्रशर वर कारवाई झाली हे मोढवे येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या एकजुटीचा विजय असल्याचे यावेळी सोलनकर व माणिक काळे यांनी सांगितले, तसेच अजून सोमेश्वर खडी क्रशर व वरद राज खडी क्रशर वर कारवाई झाली पाहिजे जो पर्यंत हे दोन्ही क्रशर बंद होत नाहीत तो पर्यंत हा आंदोलनाचा लढा थांबणार नाही.
COMMENTS