सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजितदादाकोविड सेंटर ला वाणेवाडी येथील साद संवाद ग्रुप च्या वतीने १२ हजाराचा धनादेश देण्यात आला. तसेच वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप यांचेकडून पाच हजाराचा धनादेश तर भोसले इंटरप्रायजेस चे गणेश आणि सुधीश भोसले यांचेकडून ११ हजार रुपयांचा धनादेश सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच मराठा महासंघाचे बारामती तालुका अध्यक्ष अमोल भोसले यांचेकडून किराणा माल देण्यात आला.
यावेळी डी वाय जगताप, शंकर कोकरे, दीपक भोसले, रोहित बोत्रे, निलेश जगताप, मनोज दीक्षित, मंजित कोंडे, अमोल भोसले, प्रीतम भोसले, जितेंद्र भोसले, अमर नांदखिले, गणेश भोसले, सचिन जगताप, प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.