कौतुकास्पद ! सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेकडून ६ कोविड सेंटरला १ लाख ४० हजाराचा किराणा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर कारखान्यावरील सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने बारामती, पुरंदर आणि फलटण तालुक्यातील सहा कोविड सेंटरला किराणा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 
           आज वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरला २५ हजाराचा किराणा देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे 
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, कैलास मगर, प्रभाकर जगताप, राजेश जगताप, नितीन जगताप, संजय जगताप, दत्तात्रय सौरटे, विजय थोपटे, सचिन टेकवडे, निलेश ताम्हने, राजेंद्र जगताप, हेमंत माळशिकारे, संदीप साळुंखे, पत्रकार महेश जगताप  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  वाणेवाडी कोविड सेंटर २५ हजार,  सुपे कोविड सेंटर २५ हजार,  जेजुरी कोविड सेंटर २५ हजार, वीर कोविड सेंटर २५ हजार,  नीरा कोविड सेंटर  २५ हजार तर पाडेगाव कोविड सेंटर १५ हजाराचा किराणामाल वाटप करण्यात आला. 
          यापूर्वी ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने सांगली कोल्हापूर पूरग्रस्त १ लाखाची मदत तसेच ड्रायव्हर, मालक  कुटुंबातील कोणाचा अपघात झाला तर हि संघटनेने  आर्थिक मदत केली आहे.
To Top