सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर करखान्यावरील सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर संघटनेकडून पारनेर येथील शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिराला आज २५ हजाराची मदत केली.
प्राथमिक स्वरूपात पत्रकार महेश जगताप आणि पत्रकार युवराज खोमणे यांचेकडे ही रक्कम प्राथमिक स्वरूपात सुपूर्त करण्यात आली. यानंतर सोमेश्वरनगर येथील पुणे जिल्हा बँकेतून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खाते नंबर 3182375743 या निलेश लंके प्रतिष्ठानच्या खात्यावर आरटीजीएस द्वारे वर्ग केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप काकडे, प्रभाकर जगताप, प्रदीप जगताप, पत्रकार महेश जगताप व युवराज खोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोनच दिवसापुर्वी ट्रक ट्रॅक्टर संघटनेने वाणेवाडी कोविड सेंटर २५ हजार, सुपे कोविड सेंटर २५ हजार, जेजुरी कोविड सेंटर २५ हजार, वीर कोविड सेंटर २५ हजार, नीरा कोविड सेंटर २५ हजार तर पाडेगाव कोविड सेंटर १५ हजाराचा किराणामाल वाटप करण्यात आला.
यापूर्वी ट्रक ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने सांगली कोल्हापूर पूरग्रस्त १ लाखाची मदत तसेच ड्रायव्हर, मालक कुटुंबातील कोणाचा अपघात झाला तर हि संघटनेने आर्थिक मदत केली आहे. आजपर्यंत या संघटनेचे १ लाख ७५ हजाराची मदत केली आहे.