कृषी पदवीधर संघटना पुणे जिल्हा युवती कार्याध्यक्षपदी पूर्वा जाधव

Admin

सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

कृषी पदवीधर  संघटना  पदाधीकाऱ्यांची निवड प्रकीया संपन्न झाली. यामध्ये तरडोली ता .बारामती येथिल पूर्वा रमेश जाधव  यांची   पुणे जिल्हा  युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली . 
          शेतकरी व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी  कृषी पदवीधर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे . या संघटनेच्या विविध पदाधीकाऱ्यांची निवड प्रकीया संपन्न झाली .यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांनी पूर्वा जाधव यांची  संघटनेच्या  पुणे जिल्हा  कार्याध्यक्षपदी निवड केली . या निवडीनंतर बोलताना जाधव यांनी सांगीतले  की , संघटनेचे उद्देश तळागाळापर्यंत पोहचवुन कृषी पदवीधर व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे .

.....................................................

To Top