निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण : मोरया सायकल क्लब चा उपक्रम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मनोहर तावरे

बारामतीच्या अनेक गावात सध्या सायकल क्लब च्या उपक्रमाची चर्चा आहे. या ग्रुपच्या प्रत्येक सदस्याच्या गावात जाऊन वृक्ष लागवड करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम आहे. गेली दोन वर्षांपासून मोरगाव व परिसरातील काही गावातून सुमारे 50 तरुणांचा एक गट एकत्र आहे. सध्या समाजाला व्यायामाचे व निसर्ग समतोल वृक्षारोपण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.
         या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज चांदगुडेवाडी गावात जाऊन या तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड केली आहे. या गावातील ग्रुपच्या स्थानिक सदस्यांनी झाडांचे संगोपन करावे असा सदस्यांचा मानस आहे. यासाठी ग्रुपच्या वतीने झाडे उपलब्ध करून त्यांची लागवड करण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने स्वीकारली जाते. आज सुपा येथील तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष अनिल हिरवे यांनी ग्रुपसाठी झाडे पुरवली.
              ग्रामीण आणि शहरी भागात अनेक आजार ऑक्‍सिजनच्या घटत्या प्रमाणामुळे असल्याने आहेत. यामुळे वृक्ष लागवड व या झाडांचे संगोपन महत्त्वाचे असल्याचा सामाजिक संदेश दिला आहे. व्यायामाचे महत्व पटवून देत अनेक सदस्यांना त्यांनी सामावून घेतले आहे. सुमारे शंभर जण या उपक्रमाला जोडले असून ही चळवळ अधिक गतिमान करण्याचा मनोदय ग्रुपचे प्रमुख नवनाथ उर्फ काका भास्कर यांनी बोलताना व्यक्त केला.

To Top