बारामती : मुरूम येथे राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचेकडून शिंदे कुटुंबाचे सांत्वन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------

महाराष्ट्राचे राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी आज राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन  शिंदे आणि कुटुंबीयाची भेट घेत सांत्वन केले.        
                   राजवर्धन शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना शिवाजीराव शिंदे यांचे नुकतेच निधन झाले आहे. दत्तात्रय भरणे यांनी रविवारी दुपारी मुरुम येथील शिंदे यांच्या घरी भेट देत मातोश्रींच्या निधनाबद्दल दु :ख व्यक्त करत शिंदे कुटुंबाला या दुखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी सदिच्छा व्यक्त केली.
           यावेळी राजवर्धन शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, लालासाहेब माळशिकारे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top