बारामती l मुरुमच्या माजी सरपंचाची अनामत रक्कम परस्पर काढून विल्हेवाट : चौकशीचे आदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मुरुम (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदिप कणसे यांना ग्रामपंचायतीकडून येणे असलेली १० हजार रुपये अनामत रक्कम ग्रामपंचायतीने बेअरर धनादेशाद्वारे परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून कणसे यांनी याबाबत बारामतीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
          प्रदीप कणसे यांनी १३ जानेवारी रोजी या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. सरपंच पदावर असताना कणसे यांनी ग्रामपंचायतीला आर्थिक खर्चासाठी १ लाख रुपये दिले होते. ग्रामपंचायतीने त्यांना धनादेशाद्वारे ९० हजार रक्कम दिली आहे. मात्र उर्वरीत राहिलेले १० हजार रुपये बेअरर धनादेशाद्वारे परस्पर काढून घेतली असून याची चौकशी करत तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी कणसे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
             १३ जानेवारीला या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी अर्ज दिला असताना तब्बल पाच महिने होवूनही याबाबत अहवाल आला नाही. त्यामुळे एका अर्जाच्या कामासाठी किती वेळ लागू शकतो याचा प्रत्यय येत आहे. सध्या कोरोनामुळे अनेक प्रकरणे अडकून पडली असली तरी यावर तातडीने कार्यवाही होणे गरजेचे आहे. अन्यथा सर्वसामान्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. 

संबंधित प्रकरणाचा अर्ज प्राप्त झाला आहे. याची चौकशी सुरु असून अहवाल येताच नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
राहुल काळभोर, गटविकास अधिकारी बारामती. 
To Top