सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
वाणेवाडी-मळशी (ता. बारामती) येथील मारुती पाणी वापर संस्था ही वसूल केलेल्या पाणीपट्टीची माहिती सभासदांना देत नाही. ही पाणीवापर संस्था कार्यक्षेत्रातील सभासदांना तसेच ज्या शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यावर मालकी हक्क बजावते अशा शेतकऱ्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. पुणे पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या निरा डाव्या कालव्यावरीक फाटा क्रमांक पाच याठीकाणी ही संस्था कार्यान्वित आहे. याबाबत वाणेवाडी येथील अनिल भोसले यांनी माहितीच्या अधिकारात जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे २० जानेवारी रोजी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती.
याबाबत पिंपरे येथील शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता, कार्यकारी अभियंता व पुणे पाटबंधारे विभागातील अधिकारी वर्ग अशा संस्थाची पाठराखण करत बघ्याची भूमिका घेत आहेत. पुणे पाटबंधारे विभागाने वसुलीबाबतची माहिती न दिल्याने अनिल भोसले यांनी राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठात अपील अर्ज दाखल केला आहे. तसेच भोसले यांनी राज्याचे उपसचिव यांना घोटाळेबाज संस्थेची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदा धरुन कारवाई करण्याची मागणी भोसले यांनी केली आहे.
सदर माहिती बाबत भोसले यांनी गेली दोन वर्ष संबंधित कार्यालयाकडे सदर पाणी संस्थेचे ऑडिट झाले आहे का, निवडणूक झाली आहे का, बेसुमार पैसे वसूली व बॅंक खात्याबाबत माहिती मागवली असता अद्यापर्यंत सदरील तक्रारींची दखल घेतली नाही. याबाबत भोसले हे उपोषणाला बसणार होते मात्र पुणे पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी २७ जानेवारीला आवश्यक माहिती देण्यात यावी तसेच याचा अहवाल या कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही यावर अजूनही कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारवाई न होण्यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे हे का याच्या मागे काय गौडबंगाल आहे हे न समजणारे कोडे आहे.