इंद्रजित पॉवरलाईन्स कंपनीकडून वाणेवाडी कोविड सेंटरला ११ हजाराचा धनादेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

रामराजे जगताप वि.का.सेवा सोसायटी व ग्रामस्थ मंडळ वाणेवाडी संचलित अजितदादा  कोविड सेंटर यास इंद्रजित पॉवर लाइन्स इंडिया प्रा. लि. यांच्या वतीने युवा उद्योजक इंद्रजीत राजेंद्र जगताप यांचेकडून अकरा हजार रुपये चा धनादेश सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे सुपूर्त केला.
        राजेंद्र जगताप यांची नेहमीच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये  मदत असते. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नवीन पिढीने त्याचे अनुकरण केल्याबद्दल सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
         याप्रसंगी उद्योजक राजेंद्र जगताप, उपसरपंच संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन जाधव, नंदकुमार जगताप, संस्थेचे सहसचिव प्रदीप जगताप, उपस्थित होते.
To Top