शाब्बास रे पठ्ठ्यांनो ! समाजसेवा व्हाट्सअप ग्रुप ची अशी ही समाजसेवा...कोविड रुग्णांसाठी जमा केला एक लाखाचा निधी : पुणे जिल्ह्यातील पहिला व्हाट्सअप ग्रुप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील सोशल मीडियावर समाजसेवा ग्रुप हा तालुक्यातच काय पण आता जिल्ह्यात गाजू लागला आहे. सामाजिक बांधिलकी जपत व्हाट्सअप वरील या ग्रुपने कोविड रुग्णांसाठी तब्बल एक लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. सोशल मीडियावरील कोविड रुग्णांसाठी एक लाख रुपयांचा निधी गोळा करणारा समाजसेवा ग्रुप हा पूणे जिल्ह्यातील एकमेव ग्रुप ठरला आहे.
         बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदन काकडे यांनी ८ सप्टेंबर २०१४ रोजी बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा भागातील लोकांना एकत्र घेत व्हाट्सअप च्या सोशल मीडियावर समाजसेवा नावाने ग्रुप सुरू केला. 
          या ग्रुप मध्ये सर्वच क्षेत्रातील लोक आहेत. या ग्रुप मध्ये विविध सामाजिक विषयावर नियमित चर्चा झडत असतात. या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते. सद्या राज्यात कोविड चे रुग्ण वाढत चालल्याने आपणदेखील फुल नाही फुलाची पाकळी द्यावी या उद्देशाने ग्रुपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी ही कल्पना मांडली. ग्रुप अडमीन मदन काकडे यांनी ग्रुपवर याबाबत आवाहन केले. आणि आश्चर्यम.... दोनच दिवसात कोणी दोनशे, कोणी पाचशे तर कोणी हजार रुपये जमा करत तब्बल एक लाख रुपये जमा केले. 
           येत्या दोन दिवसात बारामती आणि पुरंदर तालुक्यातील १० कोविड सेंटरला ही मदत दिली जाणार असल्याचे ग्रुप चे समन्वयक योगेश सोळष्कर यांनी सांगितले.

कोअर कमिटीची स्थापना-----
सोशल मिडीयाच्यामाध्यमातून गोळा झालेला सुमारे
सव्वालाखांचा निधी परिसरातील कोविड सेंटरला मदत
म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी गृपमधील मान्य
सदस्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. यामधे
ज्यांच्या कल्पनेतून हा निधी उभारण्याची सुरवात झाली ते
जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे पत्रकार संतोष शेंडकर
,पत्रकार महेश जगताप, डॉ राहुल खरात, प्रमोद पानसरे,
गौतम काकडे, राजेंद्र धुमाळ , अनिल
जगताप, दिलीप खैरे, सचिन टेकवडे, डॉ. सौरभ
काकडे, टि.के. जगताप , संग्राम शहाजीराव
जगताप, राजकुमार केरबा बनसोडे, योगिराज कांतिलाल
काकडे यांच्या समावेश करण्यात आला आहे. या कमिटीच्या
माध्यमातून परिसरातील दहा कोविड सेंटरला
आवश्यकतेनुसार येत्या दोन दिवसांत मदत दिली जाणार
आहे.
To Top