सोमेश्वर रिपोर्टर टीम------
समर्थ ज्ञानपीठ व ग्रामविकास संघटना वाघळवाडी यान संस्थांचे संस्थापक अध्यक्ष यांच्या ९ व्यां पुण्यस्मरण निमित्त समर्थ ज्ञानपीठ सोमेश्वरनगर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काका काकडे यांनी स्व. सावंत सरांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसे त्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतात सावंत सरांच्या आठवणींना उजाळा दिला व संस्थेचे कारभार सावंत सरांच्या मागे चागले सुरू असल्याचे समाधान व्यक्त केले. या नंतर स्व. सावंत सरांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षा रोपण मध्ये चिंच, अर्जुन,जांभळं, भावा, खाया इत्यादी प्रकारची झाडे लावण्यात आली.
या कार्यक्रमास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन .शहाजी काकडे ,पुणे जिल्हा एसटी विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड,युवा नेते गौतम काकडे , बारामती तालुका राष्ट्रवादी सरचिटणीस सुचीता साळवे, वाघळवाडी गावचे विद्यमान उपसरपंच जीतेंद्र सकुंडे, बारामती तालुका शिक्षक सेलचे अध्यक्ष अविनाश सावंत ओम साई सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अंकुश सावंत वाघळवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, चेतन गायकवाड, युवा नेते .तुषार सकुंडे, समर्थ ज्ञांपीठ व ग्राम विकास संघटना चे अध्यक्ष अजिंक्य सावंत व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि .के मोठे सर यांनी केले. उपस्थितांना अल्पोपहार केल्यानंतर कार्यक्रम संपुष्टात आला.