ॲड गणेश आळंदीकर
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व व्यवस्थापकीय समिती यानी कोव्हीड १९ च्या सर्व परिस्थीतीवर विचार करुन राज्यातील मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत येणाऱ्या सर्व न्यायालयांच्या कामकाजाविषयी महत्वपूर्ण आदेश आज ९ जुन रोजी पारीत केला. रजिस्ट्रार जनरल एस जी दिघे यांच्या सही ने हे परिपत्रक काढण्यात आले .
सदर आदेशानुसार मुंबई उच्च न्यायालयांतर्गत येणारे महाराष्ट्र गोवा व दिव दमण मधील सर्व न्यायालये ज्या जिल्ह्यात येतील तेथील कोव्हीड रुग्णांच्या वर्गवारी नुसार राज्यशासनाने जिल्ह्यांची जी पाच टप्प्यात वर्गवारी केली आहे त्याचा विचार करुन त्या वर्गवारीनुसार न्यायालयांचे कामकाज दिनांक १५ जुन २०२१ पासुन कामकाज चालणार आहे . यामधे वर्ग १ मधे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे कामकाज कोव्हीड १९ साथी अगोदर जसे पुर्णवेळ चालु होते तसेच चालणार आहे .वर्ग २ व ३ मधे जे जिल्हे येतील त्या जिल्ह्याची न्यायालयांचे कामकाज अडीच ते तीन तास चालेल .यावेळी न्यायीक अधिकारी वर्गाची १०० टक्के उपस्थीती असणार आहे .तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्गाची ५० टक्के उपस्थिती असेल .वर्ग ४ व वर्ग ५ मधे जे जिल्हे येतील त्या जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते १.३० या वेळेत न्यायालयाचे कामकाज चालेल शनिवारी ही न्यायालये बंद राहतील .फौजदारी तील रिमांड वैगेरे किवा अति महत्वाचे दावे सुट्टीच्या दिवसाप्रमाणे चालतील यामधे दिनांक १६ एप्रिल २०२१ च्या मा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायीक अधिकारी वर्गाची नेमणुक आळीपाळीने होईल व फक्त २५ टक्के कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहे .
सदर जिल्ह्याची वर्गवारी कोणत्या टप्प्यात आहे याबाबत त्या त्या जिल्हा आपत्कालीन समिती बरोबर चर्चा करुन जशी वर्गवारी असेल तसे न्यायालयाचे कामकाज चालणार आहे .
एकंदरीतच जिथे रुग्ण कमी असतील त्या जिल्ह्यातील न्यायालये जास्त वेळ चालतील म्हणजेच न्यायालयाचे ही अनलॉक च्या दिशेने पाऊल पडले आहे .