सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत दर मंगळवारी व शुक्रवारी तेलबियाचे लिलाव होतात. मंगळवार दि. ८/६/२०२१ रोजी झालेल्या लिलावामध्ये सोयाबिनला
रु. ७२२९/- प्रतिक्विंटल असा व सुर्यफुलाला रु. ६५००/- प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला. तसेच बाजार आवारात साधारण ४९२ क्विंटल आवक झाली होती. अशी माहिती समितीचे सभापती वसंत गावडे यांनी दिली.
बाजार आवारामध्ये तालुक्यासह माण, इंदापुर,
दौड, फलटण, करमाळा याभागातील शेतकरी आपला शेतमाल येथे विक्रीस आणतात.मार्केटमध्ये बाळासाहेब फराटे, शिवाजी फाळके, वडुजकर, वैभव शिंदे, आप्पा मासाळ, चंद्रकांत
पिसाळ असे आडतार असुन सोयाबिनला आप्पा मासाळ व सुर्यफुलाला चंद्रकांत पिसाळ यांचे आडतीवर सर्वाधिक दर मिळाला आहे. बारामती बाजार समीतीमध्ये प्रमुख खरेदीदार संभाजी किर्वे, संतोष श्रीमल गुगळे, जगदीश गुगळे, बाळासो फराटे हे चढी बोली लावत असलेने बाजार भावात तेजी आहे असे उपसभापती दत्तात्रय सणस यांनी सांगितले. बारामती व सुपे येथील भुसार बाजार पेठेत शेतमाल आलेनंतर प्रथम इलेक्ट्रोनिक वजन काट्यावर चोख वजन केले जाते. उघड लिलाव होउन लगेच कुठलीही नियम बाह्य कटोती न होता त्याच दिवशी पट्टी शेतक-यांना व्यापारी देत असलेने विश्वासाने शेतकरी बारामती मार्केट मध्ये शेतमाल विक्रीस आणतात असे समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी त्यावेळी सांगितले.