बारामतीतील बिबट्या सरकला पुरंदरकडे : गुळुंचे कर्नलवाडीत बिबट्याचे दर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

पंधरा दिवसापूर्वी बारामती तालुक्यातील वाकी मगरवाडी येथे तर मागील आठवड्यात गडदरवाडी परिसरात अभिजित काकडे यांच्या विराजा खडी क्रशर वरील पाच कामगारांना
बिबट्या आडवा गेला होता.  तोच बिबट्या पुरंदर तालुक्यातील गुळुंचे कर्नलवाडी परिसरातील शेतात आढळून आला आहे. गुळूंचे येथी पाटील वस्ती शेजरी असलेल्या सटवाई देवस्थाना शेजारी माजी उपसरपंच धोंडीराम लक्षमण निगडे यांच्य ऊसाच्या शेतात पाटील कुटुंबातील एका युवकाला दिसुन आला आहे. तो पुढे म्हणाल मी सटवाईच्या परिसरात होतो. अचानक बिबट्या ऊसाच्या शेतातून येताना दिसला, मी जोरात ओरडलो, वडिलांना व घरच्यांना हाका मारल्या. माझा थरकाप उडाला होता. मोबाईल हातात असुनही फोटो काढण्याच धाडसच झालं नाही. माझ्य आरडाओरडीने बिबट्या पुन्हा ऊसाच्या शेतात गेला. व्हॉटस्अप ग्रुपवर व्हायरल होत असलेला फोटो झाडावरील बिबट्याचा आहे. तो बिबट्या हाच असेल असे नाही. 
        गुळूंचे कर्नलवाडी पोलिस पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणे द्वारे सर्व गावकऱ्यांना सावध केले आहे. क्रुपया कोणी ही अफवा पसरवू नका. पण सावध रहा असे आवाहन करण्यात आले आहे. 
To Top