बारामती-इंदापूर मध्ये का होतायत राजकीय पदाधिकारी टार्गेट ? मागील दोन वर्षात चार जणांवर जीवघेणा हल्ला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती इंदापूर तालुक्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जीवघेण्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. बारामती आणि इंदापूर हा सधन तालुका म्हणून ओळखला जातो .या दोन्ही तालुक्यांना काही भाग सोडला तर  पाण्याचे वरदान आहे  नद्या कालव्यांमुळे हा भाग बागायती आहे. त्यामुळे इथे सहकारी साखर कारखानदारी ,पाणी वापर संस्था  ,सोसायट्या  ,पतसंस्था , नगर परिषद  ,नगर पंचायत ,ग्रामपंचायत  आहेत यावर ती आपलं वर्चस्व असावे व पक्ष पक्षश्रेष्ठींसमोर आपली किंमत राहावी यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्ते, यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असते .निवडणुका लागल्या की प्रचाराची रणधुमाळी चालू होते आणि यातून सुरुवात होती हेवे दावे वाद, प्रतिवाद आणि खुनशी राजकारण  या राजकारणातली वाद इतके विकोपाला जातात कि अक्षरशः  खुनी हल्ले करण्याचे धाडस आता या दोन्ही तालुक्यांमध्ये होऊ लागली आहे.
         मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने अख्ख्या  जगात थैमान घातले संसर्ग थांबवण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलाय शाळा, महाविद्यालय बंद आहेत दोन वर्षांपासून मुलं शिक्षणापासून वंचित आहेत .शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे  काय बरोबर हे किशोरवयीन मुलांना आता कळत नाही  ज्याच्या त्याच्या नादाला लागून वामन मार्ग स्वीकारण्यात ते आग्रही राहिले आहे  कमी कालावधीमध्ये जास्त पैसा मिळवायचा आणि प्रसिध्द व्हायचं यासाठी त्याचा प्रयत्न करत आहेत त्यातूनच मग  कुण्या एखाद्या राजकीय नेत्याला टार्गेट करायचं विनाकारण वाद काढून त्यांच्याशी दुश्मनी असल्याचे दर्शवून प्रसिद्धी मिळवायची आणि मग हल्ले करायचे  अल्पवयीन असल्यामुळे  शिक्षेतून माफी मिळते हे त्यांना फावते.गावागावांत वाढलेली ठेकेदारी, बेरोजगारी, पदाधिकाऱ्यांबद्दल वाढलेला असंतोष हे कारण हल्ले होण्यास कारणीभूत ठरत आहे.
.................

बारामती तालुक्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. विरोधक फक्त नावालाच आहेत. मात्र एक हाती वर्चस्व असूनही तालुक्यात पुन्हा- पुन्हा त्याच घरात अथवा त्याच पदाधिकाऱ्यांना वारंवार संधी दिली जाते. गावातील राजकारणाचा वचपा कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काढला जातो. भावकीत होणारे वाद, वर्चस्वावरुन होणारे वाद हे बारामतीला आता नवे राहिले नाहीत. वरिष्ठ नेत्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा गरीब आणि सर्वसामान्यांना नाडले जाणे पदाधिकाऱ्यांना यापुढील काळात महाग पडू शकते.
................

बारामती तालुक्यात या अगोदर एका दूध उद्योगाच्या संचालकांवर,  राष्ट्रवादीचे युवकच्या उपाध्यक्षावर एका साखर कारखान्याच्या संचालकावर तर आता नुकताच युवा नेते रविराज तावरे यांच्यावर जीवघेणा हल्याच्या घटना घडल्या आहेत. यावर लगाम घालणे गरजेचे आहे. 
To Top