पुण्याच्या दिशेने ट्रक आला आणि थेट नीरा येथील मारुती मंदिरातच घुसला : मंदिरासह ट्रकचे नुकसान

Admin
पुरंदर : सोमेश्वर रिपोर्टर टीम----

पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील अपघातांची मालीका काही ही केल्या संपेना. आज सोमवारी भल्या पहाटे एक भरधाव ट्रक पुणे बाजूने येताना सरळ निरा नदिच्या जुन्या पुलाकडे व नदिकाठी असलेल्या मारुती मंदिराच्या पायऱ्या व संरक्षण भिंतीवर आदळला. निरा नदितील मारुती मंदिराचे कठडे पाडले, मंदिराच्य संरक्षण भिंतीचे प्रचंड नुकसान केले. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
      सोमवारी पहाटे प्रत्यक्ष दर्शिंनी पाहणाऱ्यानी सांगितले,  पुणे येथून कोल्हापूरच्या दिशेने चाललेला ट्रक क्र. एम.एच.09- सी.ए - 1612 (सम्राट रोडलाईंस) निरा (ता.पुरंदर) येथी पालखी मार्गावर निरा नदिच्या पुला जवळ लावलेल्या पोलीसांच्या बँरिकेटला जोरात धडकला, त्यानंतर तो थेट पालखी तळाशेजारील जुन्या ब्रिटीश कालीन पुलावरुन भरधाव निघाला. बँरिकेटच्या व ट्रकच्या धडकेच्या आवाजाने लक्ष्मीमंदीरात बंदोबस्तावर असलेले होमगार्ड व मारुती मंदिरात झोपलेला एक व्यक्ती जागे झाले. तर ट्रक मारुती मंदिराच्या पायरीला व संरक्षण भिंतीला जोरात धडकला. धडक इतकी जोर त होती की मारुती मंदिराच्या संरक्षण भिंतीचे प्रचंड नुकसान झाले. चालक मद्याधूंद असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले. 
         ट्रकचालक सायास नगरगोजे रा. लातूर सध्या राहणार पुणे (वय ३९) याला कोणत्याही प्रकाच्या किरकोळही जखामा झाल्या नाहीत. निरा पोलीस दुरक्षेत्राचे राजेंद्र भपाकर, सुरेश गायकवाड,  होमगार्ड किरण शिंदे, मोहन साळुंखे, स्वप्नील भेस्के, प्रसाद तारु हे बंदोबस्तावर असल्याने ट्रकचालकाला तातडिची मदत मिळाली. अपघातानंतर बारामती अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहीते यांनी पहाटे गस्तीच्या वेळी भेट दिली.
To Top