सोमेश्वर रिपोर्टर टीम
सुपा ता बारामती येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास "विशेष बाब" म्हणून विचाराधीन होता त्याला आज दिनांक २८ जुन २०२१ रोजी शासन निर्णय क्र २०२१/प्र.क्र.१३७/आ-३अ निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे .अशी माहिती सुपे गावच्या सरपंच स्वाती अनिल हिरवे यांनी दिली