सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

सोमेश्वर कारखान्याच्या महत्वकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन : जानेवारी अखेरीस प्रकल्प होणार कार्यान्वित

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते पार पडले. एकूण प्रकल्पाची किंमत ७५ कोटी असून आता सोमेश्वर  कारखाना प्रतिदिन पाच हजार टनावरून साडेसात हजार टन उसाचे गाळप करणार असल्याने सभासदांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटणार आहे.  
           यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक किशोर भोसले, नामदेव शिंगटे, सुनील भगत, लालासाहेब माळशिकारे, लक्ष्मण गोफणे, ऋतुजा धुमाळ, विशाल गायकवाड, उत्तम धुमाळ, लालासाहेब नलवडे, सिद्धार्थ गीते, मोहन जगताप, शांताराम कापरे यांच्यासह राजेंद्र धुमाळ व अधिकारी वर्ग उपस्थित होता. ऊसाला हमीभाव यामुळे शेतकरी दिवसेदिवस ऊस पिकाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे ऊसाचे क्षेत्र अधिक आणि गाळपक्षमता कमी यामुळे सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्याबाबत कारखान्याला अडचणींना सामोरे जावे लागले होते.  गेल्या हंगामात सोमेश्वर कारखान्याने तब्बल सव्व्वादोन लाख टन ऊस इतर कारखान्याला दिल्यामुळे सभासदांच्या ऊसाचे वेळेत गाळप झाले. 
             यावेळी बोलताना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस गळीत हंगामात सभासदांचा १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचे सांगत सभासदांव्यतिरिक्त बिगर नोंदीचा तसेच नियमबाह्य ७ ते ८ हजार एकर ऊस उपलब्ध मात्र आपल्या कारखान्याकडे ज्या उसाची नोंद आहे असाच ऊस गाळण्यासाठी संचालक मंडळ बांधील असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.  सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी तब्बल ३७ हजार ९०८ हजार एकरांवरील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून  
बिगर नोंदीचा व नियमबाह्य असा ३ लाख टन उपलब्ध आहे. मात्र नोंदीचा ऊस वगळता इतर ऊस गाळपासाठी आपण बांधील नसल्याचे सांगत ऊस तोडणी मजुरांची घटती संख्या लक्षात घेता इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस शेतीकडे वळणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळाले असून प्रथमच सहा फुटी सरी व दीड फुटावर एक डोळा अशा पद्धतीने ऊस लागवडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी जवळपास दीडशे एकर क्षेत्रावर सहफुटी सरीचा प्रयोग राबविला जात आहे. सर्वच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या आधुनिक शेतीकडे वळावे जेणे करून हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोड करता येईल.
          गेल्या हंगामात सोमेश्वर ने आपल्या कार्यक्षेत्रातील जवळपास सव्वादोन लाख टन ऊस गाळपासाठी इतर कारखान्यांना दिला होता. येणारा गळीत हंगाम आव्हात्मक असला तरी सध्या विस्तारीकरनाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कोरोनाचे संकट व इतर काही तांत्रिक अडचणी असल्या तरी जानेवारी अखेरीस कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : सोमेश्वर कारखान्याच्या महत्वकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन : जानेवारी अखेरीस प्रकल्प होणार कार्यान्वित
सोमेश्वर कारखान्याच्या महत्वकांक्षी विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन : जानेवारी अखेरीस प्रकल्प होणार कार्यान्वित
https://lh3.googleusercontent.com/-MjDTfCHBtKk/YNS44kSMFlI/AAAAAAAAKi4/uvt4Mt1TmCQYt79St2ysQw2wrHY5I_pTACLcBGAsYHQ/s1600/1624553680454936-0.png
https://lh3.googleusercontent.com/-MjDTfCHBtKk/YNS44kSMFlI/AAAAAAAAKi4/uvt4Mt1TmCQYt79St2ysQw2wrHY5I_pTACLcBGAsYHQ/s72-c/1624553680454936-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_46.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/06/blog-post_46.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy