नीरा :
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आपल्या केरळ मधील गावी निघालेल्या सैनिकाचा नीरा येथील लॉज मध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २२ जून रोजी या सैनिकाचा मृत्यू झाला असून याबाबतची माहिती पोलिसांनी आज दिनांक २३ जून रोजी माध्यमांना दिली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
सैनिक असलेले ३९ विनल शशिधरण नायर यांचे चार चकी वाहनाने केरळमधील आपल्या गावी निघाले होते .त्यांच्या वाहनाला सातारा जवळील सेंद्रे येथे अपघात झाल्याने नीरा येथील जाधव यांच्या गॅरेज मध्ये दुरुस्ती साठीनाले होते.दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने ते गेली आकरा दिवस नीरा येथील त्रिमूर्ती लॉजमध्ये मुककमी होते मात्र दिनांक २२ रोजी ते लोक मध्ये मृत आढळून आले .याबाबतची खबर लॉज मॅनेजर संदीप ठाकूर याने नीरा पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी नायर यांना प्रथम प्राथमिक आरोग केंद्र निरववा नंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेले.
सैनिकी नियमा प्रमाणे २६ मैकनाईक इन्फेन्ट बटालियन मधील सहकारी प्रदिप तुकाराम जाधव यांनी म्रतदेह त ब्यात घेऊन पुणे येथील कमांड हॉटेलमध्ये घेऊन गेल्याची माहिती दिली. याघटनेचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक व उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुरेश गायकवाड करीत आहेत.