बारामती l पवार पब्लिक चॅरिटेबलच्या वतीने विद्यार्थ्यांना ३ लाख १३ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----

राष्ट्रवादी काँग्रेस भवन कसबा-बारामती याठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून १६ विद्यार्थ्यांना एकूण  ३ लाख १३ हजार २८६ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
        याप्रसंगी बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष .धनवान वदक व पदाधिकारी यांच्या हस्ते पात्र व गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाच्या दृष्टीने धनादेश वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे बारामती लोकसभा मतदार संघातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात येत असते. त्यानुसार बारामती तालुक्यातील या वर्षी दुसऱ्या टप्प्यातील इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांना ही मदत करण्यात आली. पवार पब्लिक चेरीटेबलकडून झालेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील शिक्षण घेण्यास मोठी मदत झाल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून  उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार.सुप्रिया सुळे व पवार पब्लिक चॅरिटेबल यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानून आनंद व्यक्त केला.
     यावेळी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब आगवणे,.उपसभापती डॉ.अनिल सोरटे, तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष.सुनिल बनसोडे, यशस्वीनी सामाजिक तालुका अभियान सह समन्वयिका.दिपाली पवार,अक्षय चव्हाण आदींसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
To Top