देशाचे पंतप्रधान जरी उद्घाटनाला आले, तरीदेखील गुंजवणीच्या पाण्याचे खरे शिल्पकार विजय शिवतारे : दिलीप यादव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा प्रतिनिधी

गेली दहा वर्ष पुरंदरला गुंजवणीचे पाणी मिळावे म्हणून पुरंदरचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे हे धडपड करत आहेत. त्यांच्याच काळात गुंजवणी धरण पूर्ण झालं आणि पाईपलाईन ही मंजूर करण्यात आली. आता या पाईपलाईनचे काम पुरंदर तालुक्यातील तोंडल पर्यंत आल्यानंतर बंद करण्यात आले आहे.असे म्हणत पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष व जिल्हापरिषद सदस्य दिलीप यादव आमदार संजय जगताप यांच्यावर टीका केली आहे.
         माजी मंत्री  शिवतारे  यांचे स्वप्न असलेली गुंजवणी पाईप लाईनचे काम आता पुरंदर मधील तोंडल   पर्यंत आले आहे. मात्र  केवळ आपल्याला श्रेय मिळावे म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी हे काम ठेकेदाराला सांगून थांबवले असल्याची माहिती मला मिळाली असून पण या देशाचे पंतप्रधान जरी या कामाच्या उद्घाटनाला आले, तरीदेखील गुंजवणी  पाणी पुरवठा योजनेचे खरे शिल्पकार विजय शिवतारे आहेत. आणि त्याचं श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी अशाप्रकारे पुरंदरच्या लोकांसाठी जीवनदाईनी असलेले गुंजवणी पाणी योजनेचे काम थांबू नये. असे आवाहन पुरंदर तालुका शिवसेनेचे अध्यक्ष दिलीप यादव यांनी केले आहे. दिलीप यादव हे पिंगोरी येथे प्रकाश शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना गुंजवणीच्या पाण्याबाबत विद्यमान आमदारांची भूमिका चुकीची असल्याचे म्हणत आमदारांवर टीका केली. त्याचबरोबर सुरुवातीपासूनच आमदार संजय जगताप यांनी या योजनेला विरोध केल्याचे त्यांनी म्हटल आहे.
           गुंजवणी पाईप लाईन  मागील कळतच पूर्ण झाली असती. मात्र आमदार संजय जगताप यांनी गुंजवणी योजनेच्या कामात  आढथळे आणले.काम वेळेत पूर्ण होऊ दिले असते तर आम्ही सासवडच्या पालखी तळावर गुंजवणीच्या पाण्याचे पूजन केले असते.मात्र आपले  राजकीय भविष्य संपून जाईल म्हणून जगताप यांनी या योजनेत अनेक वेळा अढथळे आणले आणि ही योजना लांबत गेली.आजुन ही जगताप हे काम पूर्ण होऊ देत नाहीत.केवळ उद्घाटनासाठी हे काम बंद ठेवणे म्हणजे पुरंदरकरांना पाण्यासाठी  आणखी वाट पाहायला लावणे आहे. हे योग्य नाही. आणि ही पुरंदरच्या जनतेशी केलेली बेइमानी आहे.अस यादव म्हणालेत.
To Top