सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण तालुक्यातील काळज सासवड रोडवर लोंढेवस्ती जवळ काल संध्याकाळी दोन दूचाकींच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर सोबत असलेला किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.
फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी येथील अजित हरिभाऊ पवार वय 42 रा. शेरेचीवाडी ता. फलटण आणि त्यांच्या सोबत असलेला सूर्यकांत गणपत भोसले वय 38 रा शेरेचीवाडी ता फलटण हे दोघेजण दिनांक ८ रोजी मोटारसायकलवर काळज कडून शेरेचीवाडी कडे जात असताना संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास लोंढे वस्ती नजीक आलेले असताना दूसऱ्या एका दूचाकीने दिलेल्या जोरदार धडकेत अजित हरिभाऊ पवार याचा जबर जखमी होऊन मृत्यू झाला तर सोबत असलेला सूर्यकांत भोसले हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर दुसऱ्या अनोळखी दुचाकीस्वाराने अपघात स्थळावरून पलायन केल्याने त्याची माहिती अजून समजू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झालेली नव्हती.