बारामती ! सुपे ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा दर्गा ऊरूस रद्द : कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावाने विश्वस्त, ग्रामस्थांचा निर्णय

Admin
सुपे सचिन पवार
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

बारामती तालुक्यातील हिंन्दु - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या सुपे येथील हजरत ख्वाजा शाहमन्सुर बाबांचा दर्गा ऊरूस यावर्षीही कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे रद्द करण्यात आला आहे ,
  आज शाहमन्सूर दर्गा सभामंडपात येणाऱ्या उरुसाविषयी विश्वस्त व ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची बैठक झाली आहे, यामहिन्यातील रविवार दि २७ ते बुधवार ३० या दिवसापर्यत सुपे गावचे ग्रामदैवत व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या हजरत ख्वाजा शाहमन्सूर बाबांचा उरूस होणार होता, परंतू कोरोना प्रादुर्भावामुळे व शासनाच्या निर्देशानुसार धार्मिक स्थळे बंद असल्याने यंदाचा उरुस रद्द करण्यात आला आहे. यावेळी फक्त धार्मिक विधी विश्वस्त, मानकरी, फकीर, धर्मगुरू व भाविकांच्या मोजक्याच उपस्थितीत प्रशासनाच्या आदेशानुसार पार पडणार आहे, या प्रकारे माहिती शाहमन्सूर दर्गा कमेटीचे चिफ ट्रस्टी युनूसभाई कोतवाल यांनी दिली.
            याप्रसंगी बैठकीचा अध्यक्ष म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक एस ,जी शेख , पोलीस हवलदार शेंडगें , पो.कॉ. ताडगे उपसरपंच मल्हारी खैरे,मा.सभापती शौकत कोतवाल, माजी उपसरपंच ज्योती जाधव ,बी.के.हिरवे, दादा पाटील कुतवळ ,युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे,अभिनव कुतवळ, संजय दरेकर, राघूआप्पा हिरवे, दत्ता पन्हाळे, तुषार हिरवे,अतुल ढम,वसिम तांबोळी,जाकीर शेख,सत्तार शेख,महंमदहाशम शेख तसेच दर्गा कमेटीचे विश्वस्त अमीनुद्दीन मुजावर, समीर डफेदार,अयूब शेख व ग्रामपंचायत पदाधिकारी ,ग्रामस्थ उपस्थित होते
To Top