सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बेकायदेशार सावकारकीच्या पैशासाठी एकाचा खून
करून ३०२ च्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या खासगी
सावकाराने एका साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील २७ वर्षीय युवकाचे पैशासाठी अपहरण केले.
तसेच पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून पेट्रोल टाकत त्याला युवकाला जिवंत जाळल्याची घटना
जंक्शन (ता.इंदापूर) फॉरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत
युवक ९५ टक्के भाजल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर
युवकाचा मृत्यू झाल्याने आरोपींना तात्काळ बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूरपोलिसांनी दिली.
नवनाथ हणुमंत राऊत (वय३२, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) व सोमनाथ भिमराव जळक (वय३१, रा.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
त्यांना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे (वय २७, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर) असे मयत इसमाचे नाव आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ७ जुन २०२१ रोजी
सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावुन, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले.
दि.२० रोजी वरील आरोपींनी फिर्यादी शिवराज
उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास
जंक्शन फॉरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून
जिवंत पेटवून दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.