नीरा-लोणंद रस्त्यावरील पाच हॉटेलवर कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------ 

कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या हाॅटेल वर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
          जिल्ह्य़ात अत्यावश्यक सेवा वगळून अनेक आस्थापना विकेंड लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी करण्यात आले आहेत तर काही आस्थापनांना फक्त पार्सल सुविधा चालू ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे. मात्र लोणंद-निरा रोडवर असणाऱ्या पाडेगाव कॅनाल जवळील हॉटेल यशराज, हॉटेल गणेश , हॉटेल श्री समर्थ कृपा, हॉटेल जय मातादी , हॉटेल आकाश या पाच हाॅटेलांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून ग्राहकांना सेवा देत असल्याचे आढळून आल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        याप्रकरणी पोलीस  कॉन्स्टेबल अविनाश सुरेश शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत किसन घनवट यांनी फिर्याद दाखल केली असून  सपोनि श्री. विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली पोना. डी. एच.मुळीक पुढील तपास करीत आहेत.
To Top