सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सचिन पवार
येथील दंडवाडी गावातील उत्तर खोपवाडी परिसरात दिवसा दुपारच्या वेळी दोन तीन लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सहा मेंढयाचा मृत्यु झालीची घटना घडली असुन दोन मेंढ्याना लांडग्यांने हल्ला चढवत पळवुन नेले आहे ,
दंडवाडी गावातील खोपवाडी याठिकाणी असणाऱ्या गट क्रमांक 342 मधील विजय चांदगुडे यांच्या शिवारात शेत खतविण्यासाठी मेंढयाचे कळप बसविण्यात आलेला होता , शुक्रवार दुपारच्यावेळी बकरी़ चरायईसाठी गेले असता शेतामध्ये वाघरी जाळीमध्ये बंधिस्त मेंढयाच्या कळपावर लांडग्यांने हल्ला चढवला पिसाळलेल्या लांडग्यांचा हल्ल्यात सहा मेंढयाचा मृत्यू झाला असुन दोन मेंढयांना लांडग्यांना जबड्यात शिकार करत घेऊन गेले आहे ,
या घटनेने पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मेंढपाळ भयभीत झाले असून वन विभाग कर्मचारी पिसाळलेल्या लांडग्याच्या मागावर आहे.तसेच मृत मेंढ्याचा पंचनामा करण्यात आला आहे ,
याप्रसंगी बारामती विभाग वनपाल काळे , वनरक्षक ए , एम भोंडवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी मेंढपाळ आर्मी बारामती तालुका किसन तांबे , रामभाऊ लकडे ,सागर खोमणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले , तसेच शासनाच्या वतीने मेंढपाळाना तातडीने मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली