सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
आजच्या विज्ञानवादी आणि भौतिक सुखांनी वेढलेल्या तरुणांच्या मैफिलीत कोणती पैज लागेल याचा नेम नाही. परंतु सकारात्मक आणि सद्गुणी तरुणांची सध्या समाजात वाजवा दिसते. पण तरीही कुठेतरी अशा तरुणांच्या माध्यमातून आजही आशेचा, निरोगी शरीराचा कुठेतरी कवडसा दिसतो हे निश्चित...
माळीनगर अकलूज याठिकाणी नुकताच स्नेहबंधन म्हणजे सुपारी फोडण्याचा वाढः निश्चय करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. नववधूवरांकडील जाणती व तरुण मंडळी एकत्र जमली होती .कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला. आग्रहाचे स्नेहभोजन झाले. पैपाहुण्यांच्या जुन्या नातेसंबंधांना गप्पांच्या माध्यमातून उजाळा मिळाला नव्हे तर स्वर्गातील पूर्वजांना वारसदारांच्या माणुसकीने क्षणभर हसू फुटले. कारण सामाजिकता आणि माणुसकी आज तरी लोप पावत चाललीय... तृप्ततेचा ढेकर देत सर्वच मंडळी निरोप घेण्याच्या तयारीत होती.
पण वयोमानानुसार वयस्कर आणि तरुण अशी दोन गटात ऋणानुबंधांच्या गप्पांचा फड रंगला होता. त्यात तरुणांच्या गप्पा तब्येत आणि निरोगी आरोग्याच्या रंगल्या होत्या. सहसा अशा गप्पा तरुणाच्यात नसतात. पण हे तरुण त्याला अपवाद होते निरोगी आरोग्यसाठी घ्यावयाची काळजी व डॉ.जगन्नाथ दीक्षित यांचा सल्ला या बाबीवर हे तरुण मैफीलीत रमून गेले होते. त्यातील आधार सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते रोहित राजेंद्र जगताप (मुरूम) हा पण यांत सहभागी झाला होता. त्यांची तब्येत सुदृढ चांगली... पण या गप्पात तोही समरस झाला होता. त्याच्या देहयष्टीकडे पाहून एक तरुणमित्र त्याला म्हणाला - "तू तीन महिन्यात या डाइट नुसार दहा किलो वजन कमी करून दाखव" अशी पैज लागली. रोहितने ते आव्हान स्वीकारले. त्यानुसार दैनंदिन आहार- विहार व जिद्द, चिकाटी, सातत्य व्यायामात ठेवले . अजून तीन महिने पूर्ण व्हायला दोन आठवडे बाकी असताना रोहितने वजन काट्याला स्पर्श केला .तेव्हा पंधरा किलो वजन कमी झाले होते.
ही किमया जिद्दीची,मनावरील नियंत्राणाची,आरोग्याच्या यशाची ही गुरुकिल्ली ...आजच्या व्यसनाधीन तरुणांनी आदर्श घेण्याची ही बाब नव्हे तर आचरणात आणण्याची व दीर्घायुष्यी होण्याची आहे.
रोहित जगताप यांच्या यागुणांचे कौतुक परिसरातील ग्रामस्थांनी व युवकमित्रांनी केले. आज तरी हा विषय परिसरात चर्चेचा झालेला आहे.
एस.एस.गायकवाड व स्वप्नील काकडे