पुरंदर ! पिंगोरी येथील मंदिर चोरीच्या गुन्हयातील सहा वर्षापासून फरारी असलेला आरोपी जेरबंद : पुणे ग्रा. एलसीबी पथकाची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

 ५ फेब्रुवारी २०१५ रोजी  पिंगोरी ता.पुरंधर जि.पुणे येथे वाघेश्वरी देवीचे मंदिराचे दरवाजाचे ग्रीलची लोखंडी साखळी तोडून देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचांदीचे दागिने असा किं.रू.९६,०००/- चा ऐवज चोरून नेवून धार्मिक भावना दुखावल्या. वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून जेजुरी पोलीस स्टेशनला गु.र.नं. २२/२०१५ भादंवि क. ४५४,३८०,२९५ अन्वये  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 
          सदर गुन्हयात अमृत पांडूरंग नानावत वय २५ रा.नांदूर ता.दौंड जि.पुणे व  पोपी लुमसिंग उर्फ दिपक कचरावत उर्फ राठोड वय ३२ यांना अटक करण्यात आलेली होती. त्यांचा साथीदार प्रमोद काळूराम उर्फ जीवन नानावत उर्फ रजपुत रा.काळे पिंपरी ता.खेड जि.पुणे हा गुन्हा घडलेपासून फरारी होता.
      मा.पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना, आज दिनांक १२/७/२०२१ रोजी LCB टिमला जेजुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. २२/२०१५ भादंवि क.४५४,३८०,२९५ (फरारी आरोपी यादी क्र.१६) प्रमाणे दाखल असलेल्या मंदिर चोरीचे गुन्हयातील सहा वर्षापासून फरारी असलेला आरोपी प्रमोद काळूराम उर्फ जीवन नानावत उर्फ रजपुत वय २९ वर्षे रा.काळे पिंपरी ता.खेड जि.पुणे हा केडगाव चौफुला ता.दौंड येथे येणार असल्याची बातमी मिळालेवरून सदर ठिकाणी सापळा रचून तो पळून जात असताना त्यास पाठलाग करून यवत भांडगाव फाटा येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे.
To Top