डॉ. सुभाष शहांच्या निधनाने सोमेश्वरनगर परिसर अभ्यासु वैद्यकिय तज्ञाला मुकला : ॲड गणेश आळंदीकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

१९६० च्या काळात एम बी बी एस करणारे  डॉक्टर अर्ध्या रात्री उठवले तरी चिडचिड न करणारे व्यक्तिमत्व .......ऐन तारुण्यात मोठ्या सुनबाई चे निधन असंख्य संकटाना सामोरे जावुन ज्यानी तहहयात अनेक रुग्णाना जीवदान दिले असे व्यक्तिमत्व ....डॉक्टर सुभाष शहा होते. कौटुंबिक स्नेहाने आपल्या नातवाला एम.बी.बी.एस ला ॲडमिशन मिळाले म्हणुन तर कधी गाडी नवीन घेतली म्हणुन आवर्जुन घरी पेढे पाठवत असत. एक सुंदर भारदस्त व्यक्तीमत्व होते ईंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. मला आठवतय पुर्वी करंजेपुल येथे डॉ दोशी होते त्यानंतर डॉ.सुभाष शहा आले. एखादा आजार बरेचदा डॉक्टरांच्या खात्री ने बरा होणार या शब्दामुळे सकारात्मक परिस्थीती निर्माण होते तसेच सर्प दंशाने पुर्वी अनेक रुग्ण डॉ. सुभाष शहा नी बरे केले. आयुष्यभर अभ्यास करणारे व्यक्तीमत्व ...गणेश तुझे कायद्याचे पुस्तक मला पाहीजे वाचायला... असे मला म्हणाले.. मला वाटले सहज गेलो हॉस्पिटल ला म्हणुन मागीतले असावे ,पण पुन्हा आठवणीने पुस्तक मागीतले पुस्तक दिल्यानंतर त्याचा माझ्या पुण्यातील खटल्याला फायदा झाला असे आवर्जुन सांगीतले .त्यांचेकडे गेल्यावर  मेडीकल ला जास्त जावे लागत नव्हते कारण बहुतांश गोळ्या औषधे त्यांच्याकडे उपलब्ध असत त्यामुळे एखादे औषध कुठे  मिळाले नाही म्हणुन गैरसोय होत नव्हती ...शेवटच्या काळात डॉक्टर सुभाष शहा पुण्यात राहत पण सोमेश्वरला आले कि गप्पा विनोदासाठी वाणेवाडीतील चंद्रकांत शहा ना बोलवायचे व कायद्याबद्दल माहीती करुन घेण्यासाठी मला आवर्जुन बोलवत असत त्यांच्या प्रबळ ईच्छा शक्तीने  कोरोना सारख्या आजारावर त्यानी मात केली होती .मात्र पॅरालीसीस ने त्याना दगा दिला  ... असे म्हणतात माणसाला आपला मृत्यु समोर आल्याची चाहुल लागते... अगदी दीड महिन्यापूर्वी डॉक्टर शहानी मला मृत्युपत्राबाबत माहीती विचारली होती ... त्यांच्या मागे डॉक्टर सचीन शहा त्यांची परंपरा चालु ठेवत आहेत ...सोमेश्वर परिसर एका हुशार अभ्यासु व्यक्तीमत्वाला मुकला एवढेच म्हणेन.... ईश्वर त्यांच्या पत्नीना ,राहुल शहा ,डॉ सचीन शहा ,व सर्व कुटुंबाला या दु:खातुन सावरण्याची ताकद देवो हिच सोमेश्वर चरणी प्रार्थना...
(ॲड .गणेश आळंदीकर )
To Top