ऑरेंज अलर्ट ! कोकण पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका : ३०,३१ ला 'या' जिल्ह्यांना धोका

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----  

 गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या ३० व ३१ जुलै रोजी हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
         त्यामुळे पावसाचा पुन्हा धोका वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या.२४ तासात ते आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे  जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
To Top