पुरंदर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांचा व संत सोपान काकांचा पालखी सोहळा एस्टी बसने आषाढी एकादशील गेला होता. हा पालखी सोहळा आज शनिवारी दि.२४ रोजी परतीच्या प्रावस करत होता. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सिमेवरील नीरा नदिच्या काठावरील नीरा शहरात भाविकांनी व प्रशासनाच्या वतीने माऊलींच्या व काकांच्या बसचे उतस्फुर्तपणे स्वागत केले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे संतांच्या पायी पालखी सोहळ्याला शासनाने मज्जाव घातला आहे. मात्र चल पादुका एस्टी बसमधून पांडुरंगाच्या दर्शनासाठी नेल्या जात आहेत. शनिवारी माऊलींच्या व संत सोपानकाकांच्या चल पादुका परतीच्या प्रवासा करत होत्या. पुणे जिल्ह्यात नीरेकर ग्रामस्थांनी सोपानकाकांच्या बसचे ०७:०० वाजता तर माऊलींच्या बसचे सायंकाळी ०७: ३० च्या दरम्यान माऊली माऊलींच्या गजरात स्वागत केले. जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक, उपनिरक्षक कैलास गोतपागर, सुरेश गायकवाड, महादेव कुतवळ, संदिप मोकाशी, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होत.